शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; उपचार सुरू असल्याची AIIMS च्या डॉक्टरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 4:10 PM

Chhota Rajan Dies : छोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत.

ठळक मुद्दे छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. तिहार जेलमध्ये जेरबंद असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली होती. त्याला उपचारासाठी २६ एप्रिलला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे आज एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची अफवा आज दुपारी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी छोटा राजन जिवंत असल्याची माहिती दिली आहे. तिहार जेलमध्ये जेरबंद असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली होती. त्याला उपचारासाठी २६ एप्रिलला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सोमवारी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सत्र न्यायालयात ही माहिती दिली होती. (Gangster Chhota Rajan Tests Covid Positive.)

छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. सोमवारी तिहारचे सहाय्यक तुरुंग अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाला सांगितले की, एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छोटा राजनला हजर केले जाऊ शकणार नाही. कारण छोटा राजनला कोरोनाची बाधा झाली आहे आणि त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

छोटा राजनविरोधात ७० हून अधिक प्रकरणेछोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत. तसेच त्यांना पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. याचबरोबर आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हनीफ लकडावाला याच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या हस्तकाला निर्दोष मुक्त केले होते. तो १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटाचा आरोपी होता.

 

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीjailतुरुंगAIIMS hospitalएम्स रुग्णालय