केरळ सोनं तस्करीप्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि डी कंपनीचा हात असण्याची NIA ला शक्यता
By पूनम अपराज | Published: October 15, 2020 02:19 PM2020-10-15T14:19:45+5:302020-10-15T14:21:52+5:30
Gold Smuggling : NIA ने म्हटले आहे की, आरोपीने या प्रकरणात अनेक वेळा टांझानियाला भेट दिली आहे.
कोची - केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणातील दहशतवादी कनेक्शनची चौकशी करणार्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) म्हटले आहे की, या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनीचा हात असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. NIA ने म्हटले आहे की,सोन्याच्या तस्करीतून मिळणारा नफा देशविरोधी विघातक कार्यांशी संबंधित असलेल्या गुप्तचर आणि दहशतवादी कारवायांच्या संभाव्यतेसाठी वापरला जातो.
या प्रकरणातील चौकशीसाठी सर्व आरोपींना १० दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे एनआयएने म्हटले आहे. NIAने सर्व आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला. NIA ने म्हटले आहे की, आरोपीने या प्रकरणात अनेक वेळा टांझानियाला भेट दिली आहे.
केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणातील आरोपी रमीस याने ताबडतोब चौकशी केली असता त्याने टांझानियात अनेक वेळा हिरा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्याचे एनआयएकडून माहिती देण्यात आली आहे. टांझानियात सोन्याच्या खाणीसाठी परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी एनआयएला सांगितले. त्याने टांझानियामध्ये सोने खरेदी केले आणि ते यूएईला विकले याची कबुलीही त्याने दिली.

दुसरीकडे, केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक टाळण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्र्यांचे माजी प्रधान सचिव एम. शिवशंकर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि अटकपूर्व जामिनासाठी विनंती केली आहे. शिवशंकर यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, जबाबदार सरकारी नोकर म्हणून त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये जास्तीत जास्त सहकार्य केले आहे. ते म्हणाले की. ईडीने कित्येकदा त्याला समन्स बजावले होते. शिवशंकर म्हणाले की, गेल्या एका महिन्यात ९० तासांहून अधिक वेगवेगळ्या एजन्सीद्वारे त्यांच्यावर चौकशी केली जात आहे, परंतु कोणत्याही (तपास यंत्रणेने) त्यांच्याविरूद्ध अहवाल न्यायालयात सादर केलेला नाही. मीडिया ट्रायलमुळे तपास यंत्रणेवर अत्यधिक दबाव होता, अशी मला भीती असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.