शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

वाठोड्यात तरुणाची हत्या परिसरात थरार; अज्ञात आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 10:43 PM

यश ठाकरेविरुद्ध काही महिन्यांपूर्वी लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले होते.

नागपूर : अज्ञात कारणावरून एका तरुणाची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. यश मधुकर ठाकरे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून तो हुडकेश्वर मधील झोपडपट्टीत राहत होता.

यश ठाकरेविरुद्ध काही महिन्यांपूर्वी लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले होते. मे महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला त्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याने क्वॉरेन्टीन करण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, यश काही दिवसांपासून एका पेट्रोल पंपावर काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊतनगर जवळ पडून असल्याची माहिती कळाली. त्यामुळे वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडेआपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले.

आरोपींनी यशच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक घाव घालून त्याला ठार मारले होते. दरम्यान, माहिती कळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनीही घटनास्थळी भेट दिली. ही हत्या दोन आरोपींनी केल्याचा संशय आहे. मात्र कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली ते ते रात्री १० वाजेपर्यंत उघड झाले नव्हते. आरोपींचा शोध घेण्यासाठी वाठोडा पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात चौकशी करत होती. पोलीस उपायुक्त मासाळ हेसुद्धा पोलीस ठाण्यात संशयितांची चौकशी करीत होते. अनेकांची धरपकड या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अनेक संशयितांची धरपकड केली. पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती.

टॅग्स :Murderखून