कामशेत : नाणे रोडला असलेल्या स्मशानभुमीलगत इंद्रायणी नदीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. याप्रकरणी उत्तम भुजंगराव पोटभरे (वय ३१ रा. देवराम कॉलनी, कामशेत) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली आहे. तर ठाणे अंमलदार दत्तात्रय खंडागळे व संतोष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( दि. १४) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कामशेत येथील इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावर लोकांची गर्दी जमली असता फिर्यादी उत्तम यांनी पाहिले असता नदीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. याविषयी कामशेत पोलिसांना माहिती मिळाली. या महिलेचे वय अंदाजे ४०-४५ वर्ष असुन तिची उंची पाच फुट असुन रंगाने सावळी, मजबुत बांधा असलेल्या या महिलेने हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिच्या दोन्ही हातात पितळेच्या बांगड्या, अंगठी असुन नाकात चमकी, गळ्यात मणिमंगळसूत्र, पायात पैंजन बोटात जोडव्या घातलेल्या आहे. मृतांची अद्याप ओळख पटली नसून याप्रकरणी पुढील तपास पोलीस समीर शेख करत आहे.
इंद्रायणी नदीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:17 IST