नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोव्हा ब्रिज ते विरार बावखळ पाडापर्यंत वालीव पोलीस ठाण्याची हद्द आहे. यादरम्यान अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती आयआरबीकडे पत्राने मागितली असून ती आल्यावर अनधिकृत दुभाजक बंद करणार असल्याचे कळते. जेणेकरून महामार्गावरील अपघात आणि गुन्हे रोखण्यासाठी वालीव पोलिसांनी अनोखे पाऊल उचलले आहे.मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वर अनेक हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात असल्याने येणाऱ्या ग्राहकांना सोयीसाठी आणि प्रवेशासाकरिता मार्ग बनवून त्यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने ठेवलेल्या अधिकृत दुभाजकाऐवजी अनधिकृत दुभाजक मोठ्या प्रमाणात तोडून रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी मार्ग बनविले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर अपघात होत असून त्यांची संख्या वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी वालीव पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी महामार्गाचे मेंटनेस ठेवणाऱ्या आयआरबीच्या व्यवस्थापकास सोमवारी पत्र पाठवून अधिकृत दुभाजकांची माहिती मागविली आहे. तसेच ही माहिती आल्यानंतर अनधिकृत दुभाजक बंद करणार असून यात जर कोणी आयआरबीचा अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचेही लोकमतला बोलताना सांगितले आहे. ऍसिड हल्यावरून दुभाजकांचा प्रश्न उपस्थित....दहिसरच्या कांदरपाडा येथे राहणारे अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (41) आणि सिमा विश्वकर्मा (38) हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी 28 मेच्या रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी मोटार सायकल रस्ता क्रॉस करण्यासाठी दुभाजकावर थांबले असताना अचानक समोर आलेल्या एका अनोळखी इसमाने दोघांवर ऍसिड फेकले होते. अविनाश आणि तिवारी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे असलेला दुभाजक हा अनधिकृत असेल तर या दोघांवर ऍसिड हल्ला झाला नसता आणि अविनाश यांचा मृत्यू यात झालं नसता. या ऍसिड हल्ल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुभाजकांचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाढते अपघात व गुन्हे टाळण्यासाठी वालीव पोलिसांचे अनोखे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 8:25 PM
अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती आयआरबीकडे पत्राने मागितली
ठळक मुद्देवालीव पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी महामार्गाचे मेंटनेस ठेवणाऱ्या आयआरबीच्या व्यवस्थापकास सोमवारी पत्र पाठवून अधिकृत दुभाजकांची माहिती मागविली आहे.जेणेकरून महामार्गावरील अपघात आणि गुन्हे रोखण्यासाठी वालीव पोलिसांनी अनोखे पाऊल उचलले आहे.