नियामी - आफ्रिका खंडातील नायजर या देशामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारामुळे गावांचं रुपांतर हे स्मशानात झालं आहे. बाईकवरून आलेल्या काही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 137 जण ठार झालेत. दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली. तीन तासांत दहशतवाद्यांनी लोकांची हत्या केली आहे. यामध्ये अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. तर काही ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले आहेत. बाईकवरून मोठ्य़ा संख्येने दहशतवादी आले. त्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नायजरच्या पश्चिम भागातील टाहौआतील इंटाजेने, बॅकोरेट आणि अन्य ठिकाणच्या गावांमध्ये रक्ताचे पाट वाहिले. हा भाग माली देशाच्या सीमेजवळ आहे. सध्या दहशतवादी हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 60 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जवळपास 137 जण ठार झाले आहेत. पश्चिम नायजर भागात मागील काही वर्षांपासून दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीही जवळपास 66 जणांची हत्या करण्यात आली होती. सामान्य नागरिकांसोबतच सुरक्षा दलाच्या जवानांवर देखील हल्ले करण्यात येत आहे. अमेरिकेतील कोलोराडो प्रांतातील एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार (Colorado Firing) केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये 10 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलोराडोच्या बोल्डर परिसरातील एका सुपरमार्केटमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मात्र याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.
अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू
बोल्डर पोलीस विभागाचे प्रमुख कमांडर केरी यामागुची यांनी या घटनेविषयी माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. गोळाबार करण्यामागचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी केली जात असून, नक्की किती लोकांचा मृत्यू झाला आहे, हे अजून कळू शकलेलं नाही. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि दुःखद बाब म्हणजे मृतांमध्ये एक बोल्डरमधील पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे असं यामागुची यांनी सांगितलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुपरमार्केटमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकून लोक इतरत्र पळू लागले. तसेच अनेक जण खाली पडलेले दिसले. हा धक्कादायक प्रकार परिसरातील सीसीटीव्हमध्ये कैद झाला असून फुटेज व्हायरल होत आहे.