शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

उन्नाव कांड : मदतीच्या रकमेवरून पीडितेच्या कुटुंबात वाद, वाटपावरून झाली हमरीतुमरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:18 PM

Unnao Case: उन्नावमध्ये दोन तरुणींच्या मृ्त्यूच्या घटनेवरून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पीडित तरुणींच्या कुटुंबाला मदतही जाहीर झाली होती.

लखनौ - उन्नावमध्ये दोन तरुणींच्या मृ्त्यूच्या घटनेवरून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पीडित तरुणींच्या कुटुंबाला मदतही जाहीर झाली होती. दरम्यान, या मदतीच्या रकमेवरून आता पीडितांच्या कुटुंबामध्ये वादाला तोंड फुटले आहे. (Dispute in the victim's family over the amount of aid)कुटुंबातील सदस्यांनी देण्यात येणारी मदत ही वेगवेगळ्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मृत पीडितांच्या वडिलांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगत ही मदत आपल्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली आहे. तर पीडितेच्या आईने डीएमना पत्र लिहून पीडितेचे वडील हे मद्यपी असल्याचे सांगत ती मदत आपल्या खात्यात जमा करण्याची विनंती केली आहे.उन्नाव हत्याकांडानंतर सरकराने दोन्ही मृत मुलींच्या वडिलांना पाच लाख रुपयांची मदत दिली होती. त्यानंतर मृत मुलीच्या बाबांनी दावा केला की त्यांनीच या मुलीला लहानाचे मोठे केले होते. ती आपल्याकडेच राहायची. त्यामुळे मदतीमधील अर्धी रक्कम आपल्याला मिळावी, अशी मागणी केली.तर दुसऱ्या मुलीच्या आईने डीएमनां पत्र लिहून सांगितले की, तिचा पती व्यसनी आहे. त्याचे मानसिक बरोबर नसते. खात्यात पाच लाख रुपये आल्यापासून तो वेगळ्या घरात राहतो. कुटुंबाशी असलेले संबंध त्याने संपवले आहेत. त्यामुळे चार मुलांसोबत सुनेची जबाबदारी माझ्यावर पडली आहे. या कारणाने माझ्या पतीला मिळालेली आर्थिक मदत माझ्या खात्यात वळवण्यात यावी, असे या महिलेने सांगितले.दरम्यान, मृत तरुणींच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, काल सकाळी मदतीच्या रकमेवरून पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. यावेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा नातेवाईकांनी केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या कुटुंबीयांना पांगवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश