उन्नाव - भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याने उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना २०१७ साली घडली होती. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांवर उपचार करणार्या डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. डॉ प्रशांत उपाध्याय हे ते डॉक्टर आहेत, ज्यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांवर उपचार केले होते.
मात्र, उपचारादरम्यान पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना मारहाण केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी डॉ. प्रशांत उपाध्याय आपत्कालीन परिस्थितीत होते आणि त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांना तुरूंगात पाठविले.
शवविच्छेदन अहवालातून डॉक्टराचे फुफ्फुसं, लिव्हर, किडनीसह इतर अवयव खराब झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील वादानंतर जेव्हा सीबीआय चौकशी सुरू झाली तेव्हा डॉ.प्रशांत उपाध्याय यांना निलंबित करण्यात आले आणि बर्याच दिवसानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. यावेळी, प्रशांत हे फतेहपूर येथे नोकरीवर कार्यरत होते. मात्र, सोमवारी डॉ प्रशांत यांचा मृत्यू झाला.