नवी दिल्ली - उन्नाव बलात्कारप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सिंग सेंगरला दिल्ली न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासह या प्रकरणातील सर्व दोषींना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ४ मार्च रोजी दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने सेंगरसह सात जणांना दोषी ठरवत शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी कोर्टाने चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा ९ एप्रिल २०१८ रोजी पोलीस कोठडीत मृत्यू झाला.सेंगरसह त्याचा भाऊ अतुलला देखील या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. दोघांनाही १० लाखांचा दंड पीडित मुलीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासाठी आकारण्यात आला आहे. सेंगरने २०१७ मध्ये पीडित मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी कोर्टाने मुलीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावत सेंगरची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. गुरुवारी युक्तिवाद करताना सेंगरच्या वकिलाने सांगितले की, सेंगरला राजकीय कारकीर्द आहे, दरम्यान त्याने जनतेची सेवा केली आहे. विशेष न्यायाधीश धर्मेश शर्मा म्हणाले, ही घटना सेंगरच्या सांगण्यावरून घडली, घटनेवेळी तो तिथे उपस्थित देखील होता. हे कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येकाचे कुटुंब आहे, आपण एखादा गुन्हा करीत असताना याचा विचार केला पाहिजे. तुम्ही सिस्टमची चेष्टा केली.' असे म्हणत कोर्टाने सेंगरच्या वकिलाला फटकारले.
उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपच्या निलंबित दोषी आमदाराच्या शिक्षेवर २० डिसेंबरला सुनावणी
उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारचा अपघात नव्हे घातपात? भाजपा आमदाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
Unnao Rape Case : भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगरला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, पीडितेची मागणी