पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एका व्यक्तीने खोटा अपघात घडवत आपली प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीची हत्या केली आहे. रिपोर्टनुसार, प्रेयसी या माथेफिरू प्रियकराच्या परिवारातील लोकांना त्रास देत होती. त्यामुळे तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या मित्राच्या मदतीने महिलेसहीत तिच्या मैत्रिणीचा अपघात घडवून त्यांची हत्या केली. ही घटना जेजुरी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
पोलिसांनी याप्रकरणी ड्रायव्हरसहीत तीन लोकांना अटक केली आहे. बारातमीजवळील निरा गावात १ एप्रिलला ही घटना घडली. एका विना नंबर प्लेट असलेल्या स्वीफ्ट कारने मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना धडक दिली. यात दोन्ही महिला गंभीर रूपाने जखमी झाल्या होत्या. अशात दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेबाबत नंतर पोलीस चौकशीतून धक्कादायक खुलासा झाला. (हे पण वाचा : प्रेम केल्याची पंचायतने दिली भयंकर शिक्षा, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
जेजुरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सुनील महाडिक यांनी सांगितले की, दुर्घटनेत गंभीर एका महिलेचे आरोपी किरण जेधे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि ही महिला किरण जेधेच्या घरातील लोकांना त्रास देत होती. याच कारणामुळे महिलेला धडा शिकवण्यासाठी आरोपी किरणने हा प्लॅन केला होता. त्याने त्याच्या एका २३ वर्षीय मित्र संकेत होले याला महिलेला संपवण्याची जबाबदारी दिली.
संकेत होले हा एक अट्टल गुन्हेगार आहे. अनेक केसेसमध्ये पोलिसांपासून लपण्यासाठी किरण त्यााल आश्रय देत होता. त्यामुळे दोघांची मैत्री झाली होती. हे कृत्य करण्यासाठी किरण जेधेने संकेतला हॉटेलसाठी पैसे देण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे संकेत स्विफ्ट कार घेऊन निरा येथे पोहोचला. (हे पण वाचा : नवविवाहितेकडून गरिबीचे नाटक करून फसवणूक, भिवंडीतील तीन महिलांवर गुन्हा दाखल)
१ एप्रिलला सकाळी महिला आणि तिची मैत्रीण वॉक करायला निघाल्या होत्या. तेव्हाच त्यांना कारने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, महिला बेशुद्ध पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. ड्रायव्हर फरार झाला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा ड्रायव्हर संकेत आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या किरण जेधे यांच्यातील मोबाइल संभाषणाबाबत समजले.
दोघांची चौकशी केली तेव्हा समोर आले की, या घटनेचा मास्टरमाइंड किरण जेधे आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा समोर आले की, किरण आणि मृत महिलेत गेल्या २ वर्षापासून अनैतिक संबंध होते. महिला किरणच्या घरातील लोकांना त्रास देत होती. त्यामुळे त्याने तिला संपवण्याचा प्लॅन केला.