शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पनवेलमधील ‘त्या’ हत्याकांडाचा पनवेल पोलिसांकडून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 1:45 PM

पाच आरोपींचा अटक; लूटमारीच्या उद्देशाने केली हत्या

ठळक मुद्देहत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अमरजित सिंग रामेश्वर पाल (४०) असे आहे.पनवेल शहर पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याची हत्या करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.

पनवेल - शहरातील रेल्वेस्थानक परिसरात एका अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याला जाळण्यात आले होते. मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असल्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, पनवेल शहर पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याची हत्या करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अमरजित सिंग रामेश्वर पाल (४०) असे आहे.शहर पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे स्थानकालगत सापडला होता. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, ईशान खरोटे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरात राहणाºया लोकांना मयत व्यक्तीचा फोटो दाखवून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. या वेळी घटनास्थळापासून काही अंतरावर झाडाझुडपांमध्ये जळालेली राख पोलिसांना दिसली. ही राख विखुरली असता त्यात फोर्स १ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीचे अमरजित सिंग नावाचे ओळखपत्र सापडले.पोलिसांनी सिक्युरिटीकडे संपर्क साधला असता अमरजित उत्तर प्रदेश येथील असल्याचे समजले. या वेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ा शोध घेतला असता मृतदेहाचा उर्वरित भाग अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घनश्याम सुंदर चंद्राकार (२२, छत्तीसगड), मल्लू महादेव अप्पा पुजारी (कर्नाटक), विकास सीताराम कारंडे (२०, सातारा), मोईन बिजलाल खाटिक (२२, मध्य प्रदेश), जितेंद्र गणेश यादव (३०, उत्तर प्रदेश) यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अमरजित सिंग याला मारल्याची कबुली दिली.सिंगजवळचे पैसे काढून घेण्यासाठी, लूटमारीच्या उद्देशाने त्याला या पाच जणांनी जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. आपण पकडले जाऊ या भीतीपोटी यांनी सिंगचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पूर्ण जळाला नसल्याने त्यांनी मृतदेहाचे दोन तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. याप्रकरणी प्आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकpanvelपनवेलPoliceपोलिसMurderखूनDacoityदरोडा