शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

Air India विमानात माथेफिरू प्रवाशाचा कांड; इंजेक्शन देऊन बेशुद्ध करावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 1:47 PM

काही वेळानंतर फ्लाईटच्या टॉयलेटमधून धूर येऊ लागल्याने फायर अलार्म वाजू लागला.

मुंबई - मूळ भारतीय असलेल्या अमेरिकन नागरिकाने एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये गोंधळ घातला. करुणाकान्त द्विवेदी असं या प्रवाशाचे नाव असून सहार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एअर इंडिया सिनिअर क्रू मेंबर शिल्पा मिश्रा यांच्या तक्रारीवरून द्विवेदी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये करुणाकान्त द्विवेदी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया AI 130 विमान १० मार्चला लंडन येथील वेळेनुसार, रात्री ९.३० वाजता मुंबईसाठी उडाण घेतले. काही वेळानंतर फ्लाईटच्या टॉयलेटमधून धूर येऊ लागल्याने फायर अलार्म वाजू लागला. शिल्पाने इतर क्रू मेंबर्ससह टॉयलेटचा दरवाजा उघडला तेव्हा द्विवेदी सिगरेट ओढत होते. द्विवेदी यांना समजावलं तरीही त्यांनी काहीही न ऐकता क्रू मेंबर्ससोबत वाद घातला. कसंतरी क्रू मेंबर्सने द्विवेदी यांच्याकडून सिगरेट आणि लायटर घेतले व पुन्हा जागेवर बसवले. 

प्रकरण इथेच शांत झाले नाही तर द्विवेदी थोड्या वेळाने अचानक उठले आणि फ्लाईटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. द्विवेदी यांच्या या कृत्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला. एका प्रवाशाने द्विवेदी यांना दरवाजा उघडण्यापासून रोखले असता द्विवेदी यांनी त्या प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. द्विवेदीच्या या कारनाम्यामुळे सर्व प्रवाशी चिंतेत आले. 

इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलेक्रू मेंबर्स यांनी द्विवेदी यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर इतर प्रवाशांनी क्रू मेंबर्सची मदत करत द्विवेदीला पकडले. बळजबरीने द्विवेदी हातपाय बांधून त्यांना सीटवर बसवले. तरीही द्विवेदी विमानात हातपाय आपटायला लागले. द्विवेदी यांची अवस्था पाहून फ्लाईटमधील क्रू मेंबर्सने Diaz Tan Intra Insular नावाचं इंजेक्शन त्यांना दिले. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. अखेर ११ मार्चला विमान जेव्हा मुंबई एअरपोर्टला पोहचले तेव्हा क्रू मेंबर्स आणि सुरक्षा रक्षकांनी द्विवेदी याच्याविरोधात सहार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया