(Image Credit : Aajtak)
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कुशीनगरमधून एक अशी घटना समोर आली ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले. इथे एका घरी मौलवी निकाह लावण्यासाठी रितीरिवाज पूर्ण करत होते. तेव्हा अचानक तरूणीने निकाह (Bride Refuse to Nikah) करण्यास नकार दिला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दबाव वाढला तर तरूणीने पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी तरूणीला समजावण्याचा प्रयत्न केला. ती ऐकायला तयार नव्हती तर मौलवी आणि कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली. मग तिथे पोलिसांसमोर तरूणीचा निकाह तिच्या प्रियकरासोबत करण्यात आला.
ही घटना कुशीनगरच्या विशुनपुरा गावातील आहे. इथे मुस्तफाच्या मुलीचा निकाह नंदन छपरा येथील तरूण अजहरूद्दीनसोबत ठरला होता. सोमवारी वरात आली. पाहुण्यांच्या स्वागत सत्कारानंतर निकाहला सुरूवात झाली. कुबूलनाम्याची वेळ आली तेव्हा तरूणीने लग्नास नकार दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
तरूणीने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने पाहुण्यांसोबतच तरूणीच्या घरचे लोकही हैराण झाले. घरातील लोकांनी दबाव टाकल्याने तरूणी नाराज झाली आणि तिने पोलिसांना फोन केला. तिने पोलिसांना सांगितलं की, तिचं लग्न जबरदस्ती केलं जात आहे. पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकली नाही. मग ती सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली.
पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तरूणीने पोलिसांना सगळं सांगितलं. तिने सांगितलं की, ती रामकोला वार्ड नंबर १० येथील आलम नावाच्या तरूणावर प्रेम करते. तिला त्याच्यासोबतच निकाह करायचा आहे. पण कुटुंबियांनी दुसऱ्या मुलासोबत तिचा निकाह ठरवला. ज्याचा तिने विरोध केला.
एसओ वीके सिंह यांनी ऑफ रेकॉर्ड सांगितलं की, तरूणीच्या इच्छेनुसार पोलीस स्टेशनमध्ये तिचा प्रियकर आलमच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. सोबतच दोघांच्या परिवाराच्या सहमतीने दोघांचा निकाह पोलीस स्टेशन परिसरातील मजारवर करण्यात आला.