शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
2
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
3
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
4
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
5
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
6
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
7
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
8
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
9
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
10
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
11
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
12
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
13
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
14
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
15
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
16
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
17
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
18
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
19
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
20
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...

विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:59 IST

15 दिवसांपूर्वीच झाले होते प्रगती आणि दिलीपचे लग्न...

UP Crime : गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटनांमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. ताजी घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीतून समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येची सुपारी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरीतील रहिवासी दिलीप यादव आणि औरैयाची रहिवासी असलेल्या प्रगतीचे 15 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसातच तिने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.

गावातील तरुणावर प्रेमसविस्तर माहिती अशी की, प्रगतीची मोठी बहीण पारुल, हिचा विवाह दिलीपचा मोठा भाऊ संजय, याच्याशी 2019 मध्ये झाला होता. त्यामुळे प्रगती आणि दिलीप एकमेकांना आधीपासून ओळखत होते. घरच्यांची इच्छा होती की, प्रगती आणि दिलीपचे लग्न व्हावे, पण प्रगतीचे गावातील अनुराग यादववर प्रेम होते. जेव्हा घरच्यांना या नात्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी प्रगतीचे 5 मार्च 2025 रोजी लग्न लावून दिले. पण, लग्नानंतरही तिचे अनुरागवरील प्रेम कायम होते. या प्रेमासाठी तिने गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

दिलीप शेतात जखमी अवस्थेत आढळलापोलिस अधीक्षक अभिजीत शंकर यांनी सांगितले की, 19 मार्च 2025 रोजी औरैया जिल्ह्यातील सहार पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांना एक व्यक्ती शेतात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र तीन दिवसानंतर 22 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. ही बातमी दिलीपच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच शोककळा पसरली. यानंतर दिलीपच्या भावाने सहार पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 

सीसीटीव्ही फूटेजमधून खुलासापोलिसांनी ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ अंतर्गत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक सत्य समोर आले. काही लोक दिलीपला दुचाकीवर घेऊन जात असल्याचे व्हिडिओत दिसत होते. हा सुगावा पकडत पोलिसांनी माहिती खबऱ्यांना अॅक्टिव्ह केले आणि काही वेळातच रामजी नागरचे नाव समोर आले. 24 मार्च 2025 रोजी पोलिसांनी रामजी नागरला अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.

दोन लाखात डील फायनल झालीहा संपूर्ण कट प्रगती आणि तिचा प्रियकर अनुराग यादव यांनी रचल्याचे रामजी नागरने सांगितले. प्रगती आणि अनुरागने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी रामजी नागर, अनुराग यादव आणि प्रगती यादव या तिघांना अटक केली. मात्र अद्याप तपास संपलेला नाही. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांना सुगावा लागला असून, शोध सुरू आहे.

मेरठ हत्याकांडउत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात सौरभ हत्याकांडाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. पत्नी मुस्कानने प्रियकर साहिलच्या मदतीने आधी सौरभचा गळा चिरून खून केला आणि नंतर मृतदेहाचे तुकडे करून सिमेंट असलेल्या ड्रममध्ये भरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न