उत्तर प्रदेश ही देशाची गुन्ह्यांची राजधानी आहे, हे वेळोवेळी समोर येते. आता एका प्राथमिक विद्यालयाच्या ५ वीच्या विद्यार्थ्याला दोनचा पाढा आला नाही म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याच्या हातावर ड्रील मशीन चालविल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर शाळेत विद्यार्थ्याच्या पालकांनी जोरदार हंगामा केला.
या धक्कादायक घटनेची माहिती बीएसएला मिळाल्यावर या अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन याची पाहणी केली. यानंतर त्या शिक्षकाला तातडीने हटविण्यात आले आहे. विबान या मुलासोबत हा प्रकार घडला आहे. त्याला गुरुवारी शाळेत दोनचा पाढा सांगण्यास शिक्षकाने सांगितले होते. परंतू त्याला आला नाही. यामुळे रागातून शिक्षकाने त्याच्या हातावर ड्रील मशीन डागली. यामुळे या विद्यार्थ्याच्या हातातून रक्त येऊ लागले होते.
शाळेचे हेडमास्तर सुट्टीवर होते. विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमासाठी ही ड्रील मशीन ठेवण्यात आली होती. ही मशीन हे शिक्षक विद्यार्थ्यांना घाबरविण्यासाठी वापरत होते. हा शिक्षक एका संस्थेद्वारे या शाळेत काम करत होता. अशा संस्थांना काढून टाकले पाहिजे अशी मागणी पालकांनी केला आहे. शाळांमध्ये शिकविले जात नाहीय, त्याला दोनचा पाढा येत नाहीय याचा अर्थ शिक्षक काहीच शिकवत नाहीत, असा होते, असा आरोप पालकांनी केला आहे.