शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सर्वात मोठा बँक फ्रॉड! चोरट्यांनी लंपास केले तब्बल १४६ कोटी रुपये; १८ महिन्यांपासून सुरू होतं प्लानिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 2:43 PM

१८ महिन्यांत एक कोटी रुपये खर्च करुन तीन हॅकर्स, सहा उपकरणं, तीन कीलॉकर सॉफ्टवेअर आणि तीन बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १४६ कोटी रुपयांच्या बँक फ्रॉडची घटना उघडकीस आली आहे.

१८ महिन्यांत एक कोटी रुपये खर्च करुन तीन हॅकर्स, सहा उपकरणं, तीन कीलॉकर सॉफ्टवेअर आणि तीन बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १४६ कोटी रुपयांच्या बँक फ्रॉडची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेश सहकारी बँकेच्या लखनौ मुख्यालयाचा सर्व्हर हॅक करून हा घोटाळा करण्यात आला आहे. ऑनलाइन RTGS द्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या संघटित टोळीच्या दोन सूत्रधारांसह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बँकर्सच्या संगनमताने ही टोळी चालवणाऱ्या सायबर गुन्हेगारी टोळीचा उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने पर्दाफाश केला आहे. हे प्रकरण १४६ कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचं असल्याचं उघडकीस आलं आहे. गेल्या १८ महिन्यात ३ हॅकर्स, ६ डिव्हाईस, ३ कीलॉगर सॉफ्टवेअर, ३ बँक अधिकारी यांच्या मदतीने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून हे प्लानिंग केलं जात होतं. यामध्ये नुकतेच लखनौ येथील उत्तर प्रदेश सहकारी बँक लिमिटेडचे ​​मुख्यालयाचे सर्व्हर हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

२ मास्टरमाइंडसह ५ आरोपींना अटकठगांनी बँक मॅनेजर आणि कॅशियरचे लॉगिन आयडी पासवर्ड मिळवले होते. त्यानंतर रिमोट अॅक्सेस सिस्टमवर NAD विभागात उघडलेल्या ७ खात्यांमध्ये ८ वेला व्यवहार झाले. ज्यामध्ये १४६ कोटींची आरटीजीएस करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सायबर गुन्हेगारांच्या संघटित टोळीच्या २ मास्टरमाइंडसह ५ आरोपींना लखनौ येथून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री यूपी एसटीएफचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक आयपीएस अमिताभ यश ही सर्व माहिती दिली.

आरोपींकडून STF ने १ बँक ओळखपत्र, २५ संच आधार कार्ड आणि स्वाक्षरी केलेला कोरा धनादेश, २५ सेट रहिवासी प्रमाणपत्र आणि भारतीय नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प प्लेन, ८ मोबाईल फोन, ७ एटीएम कार्ड, २५ सेट हायस्कूल आणि मूळ गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, एक कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांना ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी लखनौच्या बन मंडी तिराहा येथून अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी सहाय्यक महाव्यवस्थापक अजय कुमार त्रिपाठी यांनी सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.४५ ते ३.१५ या दरम्यान विभागात कार्यरत असलेल्या जिल्हा सहकारी बँकांच्या ७ खात्यांमधून सहकारी बँकेचे ८ व्यवहार झाले. ज्यामध्ये विकास पांडे, असिस्टंट कॅशियर आणि मेवलाल मॅनेजर यांच्या CBS आयडीवरून RTGS द्वारे इतर बँक ICICI आणि HDFC च्या खात्यांमध्ये १४६ कोटी रुपये अनधिकृतपणे ट्रान्सफर करण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी