उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) इटावा जिल्ह्यातील भर्थना भागातील गदालोटमध्ये लग्नाच्या केवळ 36 दिवसांनंतर एक तरूणाने आत्महत्या केली. तो लग्नानंतर आपल्या पत्नीला घेऊन दिल्लीला गेला होता. पण तो तिला तिथेच सोडून अचानक गावी आला आणि आत्महत्या केली. इतकंच नाही तर तरूणाच्या आत्महत्येनंतर गावातील एका तरूणीनेही आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांच्या आत्महत्येवरून प्रेम प्रकरणाचे संकेत मिळत आहेत. पण दोन्ही परिवार याबाबत गप्प आहेत. पण या आत्महत्यांची परिसरात चर्चा सुरू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्महत्या करणाऱ्या गौरवचं लग्न 15 मे रोजी झालं होतं आणि तो दिल्लीत राहत होता. दरम्यान रविवारी तो दिल्लीहून गावी आला होता. दुपारी काही काम सांगून तो घराबाहेर गेला होता. ज्यानंतर तो बेपत्ता झाला होता. शोधाशोध केली तेव्हा गावातील एका विहिरीजवळ त्याची चप्पल आणि काही वस्तू सापडल्या. गावातील लोक तिथे पोहोचले तर त्याचा मृतदेह विहिरीत पडला होता.
गौरवच्या मृत्यूची बातमी समजताच गावातील एका तरूणीने आत्महत्या केली. या दोन्ही आत्महत्यांमागे प्रेम प्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, 22 वर्षीय गौरवचा मृतदेह विहिरीत सापडला. त्याच्या मृत्यूनंतर गावातील एका तरूणीने आत्महत्या केली. असं सांगितलं जात आहे की, तरूणीचं घर गौरवच्या घरापासून 50 मीटर अंतरावर आहे. अचानक तरूणाच्या झालेल्या निधनामुळे पत्नी आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
तरूणाचे काका महाराज सिंह यांनी सांगितलं की, त्यांचा पुतण्या गौरवचं लग्न 15 मे रोजी झालं होतं. लग्नानंतर तो पत्नीला घेऊन दिल्लीला रहायला गेला होता. तिथे तो मजुरीचं काम करत होता. अचानक तो रविवारी गावी आला आणि जेवण केल्यावर दुपारी गावात गेला. उशीर होऊनही तो आला नाही तेव्हा सर्वांना चिंता वाटली. सर्वांनी त्याचा शोध घेणं सुरू केलं. रात्री उशीरा गावातील एका विहिरीत त्याचा मृतेदह आढळून आला. पोलिसांना याची सूचना देण्यात आली.
पोलीस गौरवचा मृतदेह पोस्टमार्टमला नेत असतानाच गावातील 19 वर्षीय साधनाने आत्महत्या केली. मृत तरूणीच्या आजोबांनी सांगितलं की, वडिलांच्या मृत्यूनंतर ती आई राधासोबत माहेरीच राहत होती. राधा यावेळी घरी एकटी होती. जेव्हा मी घरी आलो तेव्हा ती मृत आढळून आली. साधनाचं 15 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न होणार होतं.