शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

मदरशातून मुलींना उचलून रात्रभर बलात्कार! अतिक-अश्रफनं केले होते भयानक कांड; लिस्ट वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 1:07 PM

गेल्या 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमधील एका रुग्णालयाच्या परिसरात तीन जणांनी या दोघांचाही गोळ्या झाडून खात्मा केला.

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्यासंदर्भात आता रोजच्या रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. खरे तर या दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर त्यांची दहशत संपुष्टात आली असेल, मात्र त्यांच्या गुन्ह्यांची कुंडली पाहिल्यास, त्यांनी अल्पसंख्याक समाजातील लोकांवरही प्रचंड अत्याचार केल्याचे लक्षात येते. गेल्या 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमधील एका रुग्णालयाच्या परिसरात तीन जणांनी या दोघांचाही गोळ्या झाडून खात्मा केला.

उत्तर प्रदेशपोलिसांच्या रेकॉर्डनुसार, या दोन्ही भावांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, धमकावणे आणि जमीन बळकावणे असे शेकडो गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर त्यांनी त्रास दिलेल्यांची यादीही मोठी आहे आणि यात बहुतांश पीडीत अल्पसंख्याक समाजातील आहेत.

20 पैकी 13 मोठ्या प्रकरणांमध्ये मुस्लिम समाजातील लोक पीडित -पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "या दोघांवर 20 मोठ्या गुन्ह्यांची नोंद आहे. अहमद बंधूंनी 13 प्रकरणांत अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले होते. अतिकचा भाऊ अश्रफ, हा एका मदरशातून दोन अल्पवयीन मुस्लिम मुलींचे बंदुकीच्या धाकाने अपहरण करून त्यांच्यावर रात्रभर वारंवार बलात्कार करण्याच्या गुन्ह्यातही सामील होता. संबंधित पीडित मुलींना दुसऱ्या दिवशी सकाळी मदरशाच्या गेटसमोर फेकण्यात आले होते."

जमिनी बळकावण्यासाठी नातलगांच्याच घरावर चालवला बुलडोजर - अतीकच्या दहशतीचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रयागराजमधील कसारी मसारीचा जिशान उर्फ ​​जानू आणि अतिकचा मेहुणा इम्रान जई याचा एक भाऊ. अतिकने जिशानची जमीन ताब्यात घेण्यासाठी त्याच्या घरावर बुलडोझर चालवला होता. याशिवाय, जिशानच्या म्हणण्यानुसार, अतिकच्या गुंडांनी त्याच्यावर हल्लाही केला होता आणि त्याला पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यासंदर्भात धमकीही दिली होती."

अतिकने त्याच्या जवळच्या नगरसेवकाची करवली होती हत्या - अतिक अहमदवर नगरसेवक अशफाक कुन्नूच्या हत्येचाही आरोप होता. एवढेच नाही, तर नगरसेवक नैसनवर गोळीबार केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. नैसनने अतिकविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. यामुळे दोघांमधील मतभेद वाढले होते. पोलिसांनी म्हटल्यानुसार, अतिकने 2001 मध्ये चकियामध्ये कथितरित्या गोळ्या झाडून हत्या केली होती. याशिवाय अतिकवर 2003 मध्ये भाजप नेता अश्रफचीही कथितरित्या हत्या केल्याचाही आरोप होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा