उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील एका महाविद्यालयात सात दिवसांत तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एका विद्यार्थ्याीने हाताची नस कापल्याची खळबळजनक घटना समोर आली. कमलापूर येथील आरबीएसएस महाविद्यालयात सात दिवसांत एका पाठोपाठ तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तिन्ही मुली अल्पवयीन आहेत.
तिन्ही मुलींचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केली होती. त्यानंतर बारावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने हाताची नस कापून घेतली आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. विद्यार्थिनींवर अत्याचार होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वत:हून दखल घेत गुन्हा नोंदवला, त्यानंतर सुमारे 12 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर एका विद्यार्थिनीने नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिसरीतील विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
धक्कादायक! सोशल मीडियावर तरुणाने व्हायरल केले अश्लील व्हिडिओ, विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल...
'मुलींचा छळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्या बहिणीने नदीत उडी मारली, तिच्यावर अत्याचार होत होते. पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. गावातील प्रत्येकजण घाबरला आहे. कोणी बोलत नाही, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. प्राचार्यांनी ब्लॅकमेलिंगचा संशय व्यक्त केला आहे. कोरोनामुळे सर्वांचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले होते. प्रत्येकाकडे मोबाईल होता. ज्या गटातून मुली शिकत होत्या त्या गटात मुलांचाही समावेश होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही चौकशी समितीही स्थापन केली आहे, असंही प्राचार्य साकिब जमाल अन्सारी म्हणाले.
'तिन्ही आत्महत्यांमध्ये एकाच शाळेतील विद्यार्थिनी आहेत पण, त्यांच्या आत्महत्येची पद्धत वेगळी आहे. आम्ही प्रत्येक पैलू तपासत आहोत. सध्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.