अमेरिकेच्या मध्य फ्लोरिडामध्ये पोलिसांनी एका बाळाच्या वडिलांना अटक केली आहे. वडिलांची हॅंडगन दोन वर्षाच्या मुलाच्या हाती लागली होती. त्याने घरात झूम कॉलवर मीटिंग करत असलेल्या आईवर चुकून गोळी झाडली होती. ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. अल्टामोटे स्प्रिंग्स पोलिसांनी सांगितलं की, २२ वर्षीय वोंड्रे एवरीला मंगळवारी अटक केली गेली. त्याच्यावर हत्या आणि बेजबाबदारपणे बंदुक ठेवल्याची केस दाखल केली आहे.
चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, २ वर्षाच्या मुलाला ११ ऑगस्टला बॅगपॅकमध्ये वडिलांची बंदुक सापडली होती. त्या बंदुकीचा त्याने एक फायर केला. बंदुकीतून निघालेली गोळी त्याची आई शमाया लिनच्या डोक्यात लागली. ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. शमाया यावेळी घरात ऑफिसची झूम मीटिंग करत होती.
झूम कॉलवर असलेल्या तिच्या सहकाऱ्याने लगेच इमरजन्सी सर्व्हिस ९११ ला कॉल केला. तिने सांगितलं की, तिला व्हिडीओ कॉल सुरू असताना बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकायला आला. आणि लिन तिला पडताना दिसली आणि तिचं बाळ मागे रडत होतं. यावेळी तिचा पार्टनरही घरी नव्हता.
एवरी घरी पोहोचला तेव्हा फरशीवर सगळीकडे रक्तच रक्त झालं होतं. त्याने इमरजन्सी सर्व्हिसला सांगितलं की, जेव्हा घटना घडली तेव्हा त्याची पार्टनर कॉम्प्युटरवर ऑफिसचं काम करत होती. लिनचा मृत्यू जागेवरच झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी सांगितलं की, घटनेवेळी आणखी एक मुल घरात होतं.
अमेरिकेत लहान मुलांनी बंदुक चालवल्याची घटना काही नवीन नाही. सप्टेंबमध्ये टेक्सासमद्ये दोन वर्षाच्या मुलाने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. त्याने ती गन त्याच्या नातेवाईकाच्या बॅगमधून काढली होती. ती गन लोड होती आणि तिला सेफ्टी लॉकही लावलं नव्हतं.