US Crime News : अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातून खरनाक हत्या करणाऱ्या एका व्यक्तीला जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषी व्यक्तीने एका महिलेची हत्या केली. तिचं हृदय कापलं आणि नंतर पुन्हा चार वर्षाच्या मुलासहती दोन लोकांची हत्या केली. त्याला अमेरिकेत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
द इंडिपेंडेंटनुसार, 44 वर्षीय लॉरेंस पॉल एंडरसनने तुरूंगातून बाहेर आल्यानंतर एका महिन्यापेक्षाही कमी काळात 2021 मध्ये खतरनाक हत्या केल्या. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने एंड्रिया ब्लेंकशिपची हत्या केली आणि तिचं हृदय काढून आपल्या काकी-काकाच्या घरी घेऊन गेला. बटाट्यासोबत ते हृदय शिजवलं.
एबीसी न्यूजने सांगितलं की, त्याने 67 वर्षीय लियोन पाई आणि तिच्या 4 वर्षीय नातीची हत्या करण्याआधी दाम्पत्याला भयानक जेवण देण्याचा प्रयत्न केला.
एंडरसनला ड्रगच्या केसमध्ये 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण त्याने तीनच वर्ष तुरूंगात काढले. त्याची ओक्लाहोमाचे गव्हर्नर केविन स्टिट यांनी शिक्षा माफ केली. नंतर एका चौकशीतून समोर आलं की, त्याची शिक्षा चुकून माफ करण्यात आली होती.
एंडरसनला हत्या, मारहाण इतर काही गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आल्यावर लागोपाठ पाच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एंडरसनची काकी जी हल्ल्यात जखमी झाली होती तिने आणि इतर पीडितांच्या कुटुंबियांनी ओक्लाहोमाचे गव्हर्नर आणि जेल पॅरोल बोर्डाविरोधात केस दाखल केली होती.