US Crime News : ही घटना आहे प्रेमाच्या त्रिकोणाची. एका तरूणाने एका तरूणीच्या बॉयफ्रेंडला बॉम्बने उडवण्याचा प्लान केला होता. या तरूणाने घरीच बॉम्ब तयार केला, त्याची पॅकिंग केली. मग 7 तासांचा प्रवास करून तरूणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी डिलिवरी देण्यासाठी गेला. तरूणीच्या बॉयफ्रेंडने जसा बॉक्स उघडला बॉम्ब फुटला. या घटनेत बॉयफ्रेंड गंभीर जखमी झाला. आता याप्रकरणी व्यक्तीवरील आरोप सिद्ध झाला आहे.
एसीबी न्यूजनुसार, दोषी व्यक्तीचं वय 32 वर्षे असून त्याचं नाव एलेक्झांडर मेकॉय आहे. तो अमेरिकेच्या ओहियोमध्ये राहतो. मॅकायचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तरूणीला तो सोशल क्लबच्या माध्यमातून काही वर्षापासून ओळखत होता. पण तरूणीने मेकॉयला हे स्पष्ट केलं होतं की, ती दुसऱ्या तरूणावर प्रेम करते. मग मेकॉयने तिच्या बॉयफ्रेंडला संपवण्याचा प्लान केला.
या घटनेची सुरूवात ऑक्टोबर 2020 मध्ये झाली होती. यूएस अटॉर्नी ऑफिसने सांगितलं की, मेकॉयने होममेड बॉम्ब तयार केला. त्यासाठी मेकॉय अनेक ठिकाणी फिरला आणि बॉम्ब तयार करण्याच्या वस्तू गोळा केल्या. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने एक वस्तू अनेक ठिकाणाहून खरेदी केली. पैसे कॅशमध्ये दिले.
त्याने घरीच बॉम्ब तयार केला आणि एका पांढऱ्या रंगाच्या गिफ्ट बॉक्समध्ये पॅक केला. 30 ऑक्टोबर 2020 ला तो सात तासांचा प्रवास करून मेरीलॅंडमधील कॅरोल काउंटीला पोहोचला. इथे तरूणीचा बॉयफ्रेंड राहत होता. त्यानंतर मेकॉयने गिफ्ट तरूणीच्या बॉयफ्रेंडच्या घराच्या बाहेर सकाळी ठेवलं.
गिफ्ट बॉक्स बॉयफ्रेंडचे आजोबा घरात घेऊन गेले. दिवसभर गिफ्ट बॉक्स किचनमध्ये होता. जेव्हा बॉयफ्रेंड सायंकाळी घरी आला तेव्हा त्याने गिफ्ट पाहिलं, त्यावर त्याचं नाव लिहिलेलं होतं. गिफ्ट उघडण्याआधी त्याने गर्लफ्रेंडला मेसेज केला आणि तिला विचारलं की, हे गिफ्ट तिने पाठवलं आहे का? पण इतक्यात गिफ्ट बॉक्समधील बॉम्ब फुटला. घरात जोरदार धमाका झाला. यात तरूणीचा बॉयफ्रेंड गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तो गंभीर जखमी असल्याने त्याचं ऑपरेशन करण्यात आलं.
याप्रकरणी फेडरल एजन्सीने तपास सुरू केला. 10 मार्च 2021 मध्ये मेकॉयच्या घराची झडती घेतली. तिथे त्यांना बॉम्ब तयार करण्याच्या वस्तू आढळून आल्या. सुरूवातीला तर मेकॉयने हे त्याने केलं नसल्याचं सांगितलं. पण नंतर त्याने मान्य केलं की, हे कृत्य त्यानेच केलं.
मेकॉय शिक्षा अजून ठरलेली नाहीये. पण स्फोटक तयार करण्यासाठी आणि त्या वस्तू विकत घेण्यासाठी त्याला 20 वर्षांची शिक्षा मिळू शकते. तेच नॉन Register हत्यार आणि स्फोटकं ठेवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा मिळू शकते.