अमेरिकेतून गुन्हे विश्वातील अनेक विचित्र घटना सतत समोर येत असतात. हत्येची एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका टॅक्सी चालकाने आधीच्या पत्नीला जीवे मारण्यासाठी १३ लाख रूपयांचं लोन घेऊन किलरला सुपारी दिली. आरोपी टॅक्सी चालकाने घटस्फोटासाठी तिला द्यावे लागणारे पैसे द्यावे लागू नये म्हणून हा प्लॅन केला होता. पण याची भनक त्याच्या पत्नीला लागली आणि तिने आपली हुशारी दाखवत आपल्या पतीला रंगेहाथ पकडलं.
५४ वर्षीय अलेक्झांडर क्रासाविनला पोलिसांद्वारे त्याच्या घटस्फोटीत पत्नीच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर अटक करण्यात आली आहे. अलेक्झांडरने आपल्या एका मित्राला घटस्फोटीत पत्नीला मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी त्याने १३ लाख रूपयांचं लोन घेतं होतं. पण मित्राने याला गंमत समजत हे गुपित नीनाला सांगितलं.
यानंतर नीनाने पोलिसांसोबत मिळून अलेक्झांडरला रंगेहाथ पकडण्याचा प्लॅन केला. नीना एका मेकअप आर्टीस्टकडे गेली आणि तिनं तिचं असं मेकअप करून घेतलं की, जणू तिचा गळा कापला आहे. नंतर स्वत:ला एका क्राइम सीनवर दाखवलं. हे फोटो मित्राने अलेक्झांडरला पाठवले. नंतर त्याने त्याच्या मित्रांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले.
या घटनेनंतर नीना म्हणाली की, मी त्याच्या वागण्याने स्तब्ध झाली. आमचा घटस्फोट झाला होता. पण मी विचार केला की, नऊ वर्षाच्या मुलीचं संगोपन करण्यासाठी आमच्या चांगले संबंध आहेत. नीना म्हणाली की, 'मला विश्वास बसत नाहीये की, हे असं झालं. माझ्या मनात अजूनही त्याच्यासाठी भावना होत्या'.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, त्याने त्याच्या एका जुन्या सहकाऱ्याला घटस्फोटीत पत्नीला मारण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या व्यक्तीला सुरूवातील वाटलं की, ही एक गंमत आहे. पण जेव्हा अलेक्झांडर मित्राला सतत विचारत होता, तेव्हा तो पोलिसांकडे गेला. त्याने त्याला फसवण्यासाठी हत्येचा नकली प्लॅन केला.
हे हत्याकांड घडवून आणण्यासाठी अलेक्झांडरने बॅंकेतून साधारण १५ लाख रूपये लोन घेतलं होतं आणि हत्येच्या तयारीसाठी त्याने सहकाऱ्याला ३ लाख रूपये दिले. हत्या पूर्ण झाल्यावर आणखी १० लाख रूपये देण्यास तो तयार झाला. त्याने स्वत:साठी २ लाख रूपये ठेवले होते.