सिएटल : अमेरिकेच्या न्यायालयाने एका पाकिस्तानी व्यक्तीला बेकायदेशीरपणे मोबाईल फोन अनलॉक केल्याप्रकरणी 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या कामामुळे अमेरिकन दूरसंचार कंपनी 'एटी अँड टी'ला (AT&T) 20 कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या (Xinhua News Agency) माहितीनुसार, सिएटलमधील (Seattle) अमेरिकेच्या अटॉर्नी कार्यालयाने सांगितले की, पाकिस्तामधील कराची येथील 35 वर्षीय मोहम्मद फहद आणि त्याचा साथीदार 7 वर्षे बेकायदेशीरपणे 'एटी अँड टी'ची फसवणूक करण्यासाठी फोन अनलॉक करत होते. हे सर्व करण्यामागे मोहम्मद फहद याचा मोठा हात होता. (used to unlock mobile phone illegally caused loss of so many crores to the company)
7 वर्षात वर्षात 20 कोटी डॉलरचे नुकसानअधिकृत निवेदनात 'एटी अँड टी'च्या फॉरेन्सिक विश्लेषणामुळे समजते की, मोहम्द फहद आणि त्याच्या सह-षडयंत्रकारांनी 19,00,033 फोन अनलॉक केले होते. यामुळे कंपनीला 7 वर्षात 20,14,97,430 डॉलर आणि 94 सेंटचे नुकसान झाले आहे. रिपोर्ट म्हटले आहे की, शिक्षेची सुनावणी करताना अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश रॉबर्ट एस लासनिक (Robert S. Lasnik) म्हणाले की, फहदने एक भयानक सायबर क्राईम केला होता.
'एटी अँड टी'च्या कर्मचाऱ्यांना दिली लाचमोहम्मद फहदने 2012 मध्ये हा घोटाळा सुरू केला आणि इतरांसोबत 'एटी अँड टी' कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वॉशिंग्टनमधील बोथेल येथील कॉल सेंटरमध्ये मोठ्या संख्येने फायद्याचे सेल्युलर फोन अनलॉक करण्यासाठी कट रचला. अपात्र ग्राहकांसाठी फोन अनलॉक करण्यासाठी मोहम्मद फहदने 'एटी अँड टी' कर्मचाऱ्यांची भरती केली आणि त्यांना लाच दिली. त्यानंतर मोहम्मद फहदने कस्टम मालवेअर आणि हॅकिंग टूल्स इन्स्टॉल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना लाच दिली, त्यामुळे त्याला पाकिस्तानमधून फोन अनलॉक करण्याची परवानगी मिळाली.
वायर फसवणुकीच्या कटात दोषीरिपोर्ट म्हटले आहे की, सप्टेंबर 2020 मध्ये तो वायर फसवणुकीच्या (Wire Fraud) कटात दोषी आढळला. अमेरिकेच्या अॅक्टिंग अटॉर्नी टेसा एम. गोरमन म्हणाले, "हा एक जुना सायबर गुन्हेगार आहे, ज्याने आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर केला आहे. तसेच, यासाठी लाच देण्याचे आणि धमकावण्याचे काम केले आहे. त्यामुळे कंपनीला 20 कोटी डॉलरचे नुकसान झाले."