आई-वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीने घराबाहेर काढले, 6 नराधमांनी केला सामूहिक अत्याचार…

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 01:54 PM2024-08-18T13:54:32+5:302024-08-18T13:54:39+5:30

कोलकात्यानंतर डेहराडूनमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना. बसचालक आणि कंडक्टर अटकेत.

Utarakhand-dehradun-Crime-minor-girl-gang-raped-in-bus-stand-bus-driver-involved | आई-वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीने घराबाहेर काढले, 6 नराधमांनी केला सामूहिक अत्याचार…

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीने घराबाहेर काढले, 6 नराधमांनी केला सामूहिक अत्याचार…

Crime News : कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, कोलकातासारखीच घटना उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील एका हॉस्पिटलच्या नर्ससोबत घडली. नर्सवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. त्या घटनेच्या दोन दिवसानंतर आता राजधानी डेहराडूनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडूनच्या बसस्थानकात बसचालक आणि त्याच्या साथीदारांनी बसमध्येच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. मुलीची तब्येत बिघडल्यानंतर आरोपींनी तिला बसस्थानकाबाहेर सोडून पळ काढला. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेनंतर मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

पंजाबला सोडते सांगून आणले...
आरोपी बस चालकाला 12 ऑगस्ट रोजी पीडित अल्पवयीन मुलगी दिल्ली बसस्थानकात सापडली होती. तिला पंजाबला जायचे होते. ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिला पंजाबला नेण्याचे आश्वासन देऊन डेहराडूनला आणले. तिथे तिच्यावर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि बसस्थानकाच्या गेटबाहेस सोडून पळ काढला. बसस्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुलगी जखमी अवस्थेत आढळली आणि त्यांनी याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला दिली. 

बहिणीने घरातून बाहेर काढले...
पोलिसांनी बस स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही स्कॅन करुन आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतले. ज्या बसमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता, ती बसही पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आई-वडीलांचे निधन झाले असून, ती आपल्या विवाहित बहिणीसोबत राहायची. 11 ऑगस्ट रोजी तिच्या बहीणीने तिला घराबाहेर काढल्यानंतर ती दिल्लीला पोहोचली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Utarakhand-dehradun-Crime-minor-girl-gang-raped-in-bus-stand-bus-driver-involved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.