Uthra murder case: कोब्रा अंगावर सोडून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 05:08 PM2021-10-15T17:08:26+5:302021-10-15T17:10:27+5:30

कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे.

Uthra murder case: Kerala Man who killed his wife with cobra gets double life sentence, 17 years prison | Uthra murder case: कोब्रा अंगावर सोडून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

फोटो क्रेडिट: द हिंदू

Next

अंगावर विषारी क्रोबा सोडत पत्नीची निर्घुण हत्या करणाऱ्या केरळमधील दोषी पतीला कोर्टाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे सांगत कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे.

३२ वर्षीय आरोपी पती सुरजने हुंड्यासाठी २५ वर्षीय पत्नी उत्तराचा छळ करत हत्या केली. या प्रकरणी कोर्टाने आता पत्नीच्या हत्येसाठी कोब्रा नागाचा उपयोग करणे, विष देणे, पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करणे आणि हत्या असे गुन्हे आरोपीवर ठेवले आहेत. यापैकी विष देण्याच्या गुन्ह्यासाठी १० वर्षं आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. ही शिक्षा भोगून झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुरू होणार आहे.

काय आहे प्रकरण?
७ मे २०२० रोजी उथरा घरामध्ये झोपलेली असताना तिला कोब्रा चावला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. यानंतर उथराच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती सूरजवर तिच्या हत्येचा आरोप केला होता. सूरजने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन तो चावल्यामुळे तिचा मृत्यू होईल. तपासामध्ये सूरजने दोन वेळा साप पकडणाऱ्याला पैसे देऊन साप खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्याने याआधीही सर्पदंशाने पत्नी उथराचा काटा काढण्याचा मोठा कट रचला होता. मात्र त्यामध्ये तो यशस्वी झाला नाही अशी माहिती समोर आली आहे. 

हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचा
सूरजला लग्नामध्ये भरपूर हुंडा देण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, नवीन कार आणि सोन्याचे दागिने यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. मात्र तरी देखील तो समाधानी नव्हता. तो सतत पैसे मागत असे. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचा असा आरोप उथराच्या कुटुंबीयांनी केला होता. उथराच्या मृत्यूवरुन तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे सूरजला अटक करण्यात आली होती.

Web Title: Uthra murder case: Kerala Man who killed his wife with cobra gets double life sentence, 17 years prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.