शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

Crime News: धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा; तिघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:26 PM

Crime News Nagpur: गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशीर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. एक मोठे रॅकेट त्यात गुंतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरिबांना वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून घेणाऱ्या रँकेटमधील तिघांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. काैसर आलम शाैकत अली खान, प्रसाद रामेश्वर कावरे आणि असल्लम मुस्तफा ऊर्फ भूप्रियबंदो देवीदास मानकर अशी या तिघांची नावे आहेत. ते गणेशपेठ परिसरात लपूनछपून वावरत होते. काैसर हा धनबाद, लोहिचारा (झारखंड) येथील, तर कावरे आणि मानकर नागपुरातील रहिवासी आहेत.

गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशीर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. एक मोठे रॅकेट त्यात गुंतले होते. गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये धर्मांतर विरोधी कायद्याचा गुन्हा दाखल करून यूपी एटीएसने या रॅकेटचा भंडाफोड केला होता. रॅकेटमधील काहींना अटकही केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेल्या कारवाईतून आणि मिळालेल्या माहितीवरून या रॅकेटमध्ये महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथील एक हजार पेक्षा जास्त जणांची नावे आणि पत्ते एटीएसला मिळाले. त्याआधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई सुरू केली. या रॅकेटशी संबंधित काही जण नागपुरात लपून असल्याचे यूपी एटीएसला कळले. त्यामुळे एटीएसच्या पथकाने शुक्रवारी दुपारी नागपूर गाठले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांनी कारवाईसाठी मदत मागितली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल कॉम्प्लेक्समध्ये छापा घातला. येथे २०२ क्रमांकाच्या सदनिकेत लपून असलेल्या काैसर आलम, प्रसाद कावरे आणि असल्लम मुस्तफाला जेरबंद केले. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे आणि चिजवस्तूही जप्त करण्यात आल्या. त्यांना घेऊन एटीएसचे पथक शनिवारी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले.

कारवाईबाबत गोपनीयता

या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. शनिवारी दुपारी ही कारवाई चर्चेला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत विस्तृत माहिती नसल्याचे सांगून यूपी एटीएसच्या गुन्ह्यात ते वॉन्टेड होते. त्यांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांनी मदत केल्याचे सांगितले.

मानकर ‘कन्व्हर्ट’, कावरे वाटेवरमानकर आणि कावरे अनेक दिवस उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला होते. मानकरने धर्मांतरण केले तर कावरेने धर्मांतर करून घेतले असले तरी त्याने ते उघड केले नव्हते. कावरेेने स्वत:सोबतच कुटुंबातील दोन सदस्याचेही धर्मांतरण करून घेतल्याची माहिती आहे. नागपुरात त्याने सावज शोधण्याचे प्रयत्न चालविले होते, अशीही माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर