शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Uttar Pradesh conversion racket: उत्तर प्रदेश धर्मांतरण रॅकेट: यवतमाळच्या युवकाला कानपूरमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 11:47 PM

Crime News: धर्मांतरासाठी अर्थसहाय्य : लखनऊ एटीएसची कारवाई.  लखनऊ एटीएसने धिरजला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळातील स्थानीक एटीएसच्या पथकाने धीरजच्या वाघापूर परिसरातील घराची पाहणी केली. मात्र त्याचे त्याचे वृद्ध वडील आढळून आले.

यवतमाळ : येथील वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनी मध्ये राहणाऱ्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे शुक्रवारी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराशी निगडीत टोळीतील सदस्य यवतमाळ जिल्ह्यात आढळले. पुसद येथून लखनऊ एटीएसने डॉ. फराज शहा याला अटक केली. त्यातूनच यवतमाळच्या युवकाचा सुगावा लागला. (Uttar Pradesh ATS has arrested Dhiraj Jagtap from Kanpur for his involvement in religious conversion racket)

धीरज गोविंद जगताप (देशमुख) (३८) असे लखनऊ एटीएसने अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. तो पुसद शहरातील वसंत नगर भागात राहणारा डॉक्टर फराज शहा सोबत धर्मांतराचे काम करत होता. डॉ. फराज याला लखनऊ एटीएसने दीड महिन्यापूर्वी पुसद शहरातून अटक केली. त्यानंतर धर्मांतरासाठी काम करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला. त्याअंतर्गत राज्यासह देशभरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळ शहरातील धीरज जगताप या युवकाला कानपूर मध्ये अटक झाली. धीरज यवतमाळ मध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होता. मात्र काही दिवसानंतर त्याने धर्मांतर करून तो घराबाहेर पडला तो घरी फिरकत नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन निघून गेली.

 लखनऊ एटीएसने धिरजला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळातील स्थानीक एटीएसच्या पथकाने धीरजच्या वाघापूर परिसरातील घराची पाहणी केली. मात्र त्याचे त्याचे वृद्ध वडील आढळून आले. धीरज बाबत त्याठिकाणी फारशी माहिती मिळाली नाही. धीरज हा धर्मांतराच्या प्रकियेत अर्थ सहाय्य करत असल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. धर्मांतराच्या प्रक्रियेत यवतमाळातील युवकाचा सहभाग असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश