प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या कपल्सचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. घरातून त्यांना होणारा विरोध, त्यासाठी होणारी भांडणे हेही आपण वाचत असतो. पण उत्तर प्रदेशातील एटामधील एका १९ वर्षीय मुलीने तर असं काही केलं की, वाचून हैराण व्हाल. येथील एका १९ वर्षीय तरूणीने तिच्या बॉयफ्रेन्डसोबत मिळून स्वत:च्याच अपहरणाचा प्लॅन केला. जेणेकरून वडिलांना १ कोटी रूपयांची खंडणी मागू शकेल. पण तिचा हा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही.
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे मेहरा पोलीस स्टेशन विभागाच्या नगला भजना गावातील. पोलिसांनुसार, तरूणी २३ जुलैला बेपत्ता झाली होती. नंतर एक अपहरणकर्ता म्हणून आपल्या आई-वडिलांना फोन केला आणि हरियाणवी भाषेत खंडणी मागितली. पण तरूणीच्या आई-वडिलांनी समजदारी दाखवत पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली. चौकशीदरम्यान त्यांना अपहरणकर्त्याचा सतत येणाऱ्या फोनवर आणि फोनवर तरूणीच्या आई-वडिलांशी जास्त वेळ बोलणं अधिकाऱ्यांना खटकलं. त्यानंतर पोलिसांनी लगेच तरूणीचा मोबाइल स्ट्रेस करणं सुरू केलं.
पोलीस अधिकक्ष एटा राहुल कुमार यांनी सांगितले की, 'आम्हाल नंतर असं समजलं की, तरूणी खंडणीसाठी तिच्याच फोनचा वापर करत होती. शनिवारी तिला तिच्या घरापासून केवळ १०० मीटर अंतरावरून ताब्यात घेण्यात आलं. तरूणी आणि तिचा बॉयफ्रेन्ड दोघेही शेजारी आहे. दोघेही साधारण २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
तरूणीला हे समजलं होतं की, तिचा परिवार एका कोटी रूपये खर्चून शाळा सुरू करण्याचा विचार करत आहेत. अशात तरूणीने बॉयफ्रेन्डला तिचा प्लॅन सांगितला. दोघांनी हे पैसे घेऊन पळून जाण्याचा प्लॅन केला होता. पण तिचा हा प्लॅन अपयशी ठरला. पोलिसांनी तरूणीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. मात्र, तरूणीचा बॉयफ्रेन्ड फरार झाला आहे.
हे पण वाचा :
मुलानेचं रचला स्वतःच्या अपहरणाचा कट; बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी
संजय दत्तच्या अडचणी वाढणार? राजीव गांधी हत्येतील एजी पेरारीवलन याची उच्च न्यायालयात याचिका