शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

पत्नी मारते, आपटते, चावते; न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन! तक्रार करायला गेलेला पती रडकुंडीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 11:51 AM

पत्नी पीडित पतीनं नोंदवली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; व्यथा मांडताना अश्रू अनावर

ललितपूर: पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पतीनं आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. पत्नीपासून वाचवा, मला न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन, अशा शब्दांत पीडित पतीनं त्याची व्यथा मांडली. पत्नी प्रचंड त्रास देते. वर पोलिसात तक्रार दाखल करते. त्यामुळे पोलीस मला पकडून नेतात. मी मजूर करून पोट भरतो. पोलिसांनी सतत पकडून नेल्यावर पोट कसं भरायचं, खायचं काय, घर कसं चालवायचं, असे प्रश्न पीडित पतीनं उपस्थित केले.

उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधल्या भदैयापुरा येथे राहणारा बृजेश कुमार त्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे गेला. रडवेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या बृजेशला तिथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी त्याला असलेली समस्या विचारली. आपली व्यथा मांडताना बृजेश ओक्साबोक्सी रडू लागला. रडत रडतच त्यानं त्याची समस्या सांगितली.जीन्सवर पिवळा पेंट लावून विमानतळावर उतरला; अधिकाऱ्यांना संशय आला अन् मग...

'माझी पत्नी प्रचंड त्रास देते. त्यामुळे मी एसपींना भेटायला आलो होतो. पत्नी दररोज भांडते. वर माझ्याच विरोदात पोलिसात तक्रार दाखल करते. जवळपास १० ते १५ वेळा पोलिसांनी मला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. पत्नी सतत वाद घालते. पैसे काढून घेते. माझ्या कुटुंबातील सदस्यांशीदेखील ती वारंवार भांडत राहते,' अशी व्यथा पीडित पतीनं मांडली.

'आजच पत्नीनं मला आपटलं, मारलं, मला चावली. अनेकदा पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी घरी येऊन समजवण्याचा प्रयत्न केला. मला न्याय हवाय. अन्यथा मी इथेच मरेन. मला न्याय मिळाला नाही, तर मला इथेच मरावं लागेल. मी मजुरी करून कुटुंबाचं पोट भरतो. पण पत्नी सतत भांडत असल्यानं प्रचंड मनस्ताप होतो. तिच्या तक्रारीनंतर पोलीस मला पकडून नेतात. मजुरी केली नाही तर माझ्या कुटुंबानं खायचं काय?', असा प्रश्न पीडित पतीनं रडत रडत विचारला.