उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊच्या दुबग्गा भागात केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा पुतण्या, तसेच रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या नंद किशोर यांनी आत्महत्या केली आहे. नंद किशोर यांनी आपल्या खोलीत चादरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुखवीर सिंह भदोरिया घटनास्थळी पोहोचलेले. नंद किशोर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दुबग्गा येथील बेगारिया परिसरात ते राहत होते. आज सकाळी घरातील सदस्यांनी नंदकिशोर यांना त्यांच्या खोलीत फासावर लटकलेले पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. घरच्यांनी त्यांना घाईघाईत खाली उतरवले आणि रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे.
काही दिवसांपासून तणावत होते -सुखवीर सिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नंद किशोर यांनी दोन लग्न केले होते. त्यांची एक पत्नी मुस्लीम होती तर दुसरी हिंदू होती. या दोन्ही पत्नींना मुले आहेत. त्यांना पहिल्या दोन पत्नी पासून अफजल आणि साहिल अशी दोन मुले आहेत. तर दुसऱ्या पत्नीपासून विशाल आणि आदर्श अशी मुले तर अंशिका आणि शिका अशा मुली आहेत. विशाल याने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांना रिअल इस्टेटचा बिझनेस होता. काही दिवसांपासून ते तणावात होते. जेव्हा आम्ही त्यांना विचारत होतो, तेव्हा ते काहीही सांगत नव्हते. वडील असे काही करतीय यावर विशावस बसत नाही, असेही त्याने म्हटले आहे.
सुनेने कापली होती हाताची नस- यापूर्वी मार्च 2021 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांची सून अंकिता हिनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्यासमोरच आपल्या हाताची नस कापली होती, तेव्हा हे प्रकरण बरेच चर्चेत आले होते. एवढेच नाही, तर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या मुलाचाही अति नशा केल्यामुळे मृत्यू झाला आहे.