शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
2
बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
3
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
4
आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील
5
मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
6
शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी
7
‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश
8
शिक्षक भरती घोटाळा: मुख्याध्यापकाने पाठवलेला प्रस्ताव झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती
9
Viral Video: कारच्या डिक्कीतून बाहेर लटकला हात; रील करण्याचे कारण तपासातून आले समोर
10
पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे
11
अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
12
विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!
13
चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान
14
राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर
15
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
16
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
17
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन
18
IPL 2025 : चहल ठरला PBKS च्या 'ब्लॉकबस्टर' शोचा हिरो! प्रीतीनं गळाभेट घेत थोपटली फिरकीपटूची पाठ
19
ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”
20
IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

वसईत ११ कोटी ५८ लाखांचा २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रॉन व ४८ ग्रॅम कोकेन सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:40 IST

नायजेरियनला अटक, गुन्हे शाखा २ ची कारवाई

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा : वसईच्या एव्हरशाईन परिसरात ११ कोटी ५८ लाख ४१ हजार १०० रुपये किंमतीचा २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रॉन व ४८ ग्रॅम कोकेन सापडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली असून एका नायजेरियन आरोपीला अटक केल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. आरोपीला वालीव पोलिसांच्या ताब्यात तपास व चौकशीसाठी देण्यात आले असल्याचेही सांगितले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींची माहीती घेवून त्यांचेवर कारवाई काण्याचे अनुशंगाने माहीती घेणे चालू होते. ५ एप्रिलला रात्री सव्वा बारा वाजता गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस हवालदार सचिन पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून वसईच्या एव्हरशाईनसिटी परिसरातील फरशी कारखान्याचे जवळील महेश अपार्टमेंटमध्ये एक व्हिक्टर नावाचा परदेशी नागरीक अंमली पदार्थांचा साठा करून गि-हाईकांना विक्री करीत असल्याची खात्रीलायक बातमी प्राप्त झाली. 

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदाराचे पथकाने एव्हरशाईन सिटीतील महेश अपार्टमेंटच्या तिसरा मजल्यावर छापा मारला. या कारवाईत आरोपी व्हिक्टर ओनुवाला उर्फ डाईक रेमंड (३७) याच्या राहते घराची झडती घेतली. त्याचे घरातून ४८ ग्रॅम कोकेन व त्याचे स्वतःचा डाईक रेमंड या नावाचा बनावट पासपोर्ट मिळून आला.

आरोपी व्हिक्टरच्या घरझडती दरम्यान मिळालेल्या चावीचे आधारे सदर बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावरील रुममधून २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रोन मिळाला. तसेच अंमली पदार्थाचे गुणवत्तेत बदल करणेकरीता वापरले जाणारे केमिकल मिळून आल्याने ते जप्त केले. नमुद रुमचे झडती दरम्यान नायजेरिया देशाच्या ईग्वेनुबा लेगॉस याचा पासपोर्ट मिळून आल्याने त्याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी