वसई - वसई पूर्व भागातील सायवन गावात एका घरामध्ये विरार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बी. टी. घनदाट यांच्या पथकाने आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान राहत्या घरी कारवाई करूनस्फोटक जप्त केली आहेत. १८३ जिलेटीन कांड्या, १०३ इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर, ३४५ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर ही स्फोटके त्यांच्या घरात मिळाली. तसेच पोलिसांनी तुकाराम मारुती हडळ (वय 50रा. सायवन) आणि त्याची पत्नी भीमा तुकाराम हडळ (वय45) या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. हे दाम्पत्य गेली अनेक वर्ष वसईत राहत असून भारतीय कलम स्फोटक पदार्थ अधिनियम4/ख प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
वसईच्या खाडीत सेक्शन पंप लावून बेकायदेशीरपणे हजारो ब्रास रेती उपसा करण्यात येत असतो. या वाळू माफियांवर पोलीस आणि महसूल प्रशासनाची कारवाई सुरू असली तरी हे वाळू माफिया सक्रीय आहेत. खाडीत असलेली वाळू एकत्रित मोठ्या प्रमाणावर जमा करता यावी यासाठी आता वाळू माफिया स्फोटकांचा वापर करू लागले आहेत. खाडीत स्फोट करून तळाशी असलेली घट्ट वाळू सैल होते आणि सक्शन पंपाद्वारे ती गोळा केली जाते. यामुळे एकाच वेळी हजारो ब्रास वाळू मिळते. ही माहिती मिळतात रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी आणि पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने विरार जवळील चांदीप येथे छापा घातला. एका घरात पोलिसांना २४ जिलेटींच्या कांड्या आणि साडेआठ किलो स्फोटके आढळून आली. या कारवाईच्या दरम्यान ट्रकचालक, वाळू उपसा करणारे फरार झाले होते.