एका अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल मोठया प्रमाणावर होत आहे. यात वाहतूक पोलीस (Traffic Police) नाकाबंदीदरम्यान रिक्षाला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या रिक्षाला हा वाहतूक पोलीस अडवण्याचा प्रयत्न करत आहे. तिच रिक्षा त्याच्या अंगावर येते आणि थेट त्याला उडवून निघून जाते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पाहताना काळजाचा ठोका चुकतो. हा वाहतूक पोलीस थेट रिक्षेसह फरफटत गेला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ चेन्नईमधल्या नंदमबक्कम भागातील माउंट पूनमल्ली चौकातला असल्याचं सांगण्यात येतं आहे. नंदमबक्कमचे उपनिरीक्षक पोनराज (Ponraj) आणि महिला कॉन्स्टेबल नाकाबंदीसाठी थांबली होती. त्यावेळी ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणारी ऑटो दिसल्यावर पोलीस उपनिरीक्षक पोनराज यांनी ऑटोला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढे मोठा अपघात झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.