पाटणा : पाटण्यात उघड्या मॅनहोलमुळे एक महिला त्यात पडली. मात्र, लोकांनी वेळीच तिला मॅनहोलमधून बाहेर काढून वाचवले. सात ते आठ फुटांचा खड्डा असलेला हा मॅनहोल उघडा असून महिला मोबाईल फोनवर बोलत जात होती. याच दरम्यान ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. महिलेला किरकोळ ओरखडे आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.वास्तविक, पाटणा शहरातील वॉर्ड-56 अंतर्गत मलिया महादेव जल्ला रोडवर एक मॅनहोल उघडा होता. नमामि गंगे योजनेंतर्गत नाल्याच्या बांधकामासाठी उघडलेली चेंबर महिलेने पहिले नाही आणि ही दुर्घटना घडली. दुसरे कारण म्हणजे महिलेसमोर टोटो वाहन चालत होतं, त्यामुळे चेंबर उघडे होते ते दिसले नाही. महिलाही मोबाईलवर बोलत होती.काही सेकंदात लोकांनी महिलेला बाहेर काढलेयेथे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ती महिला कशी पडते आणि आजूबाजूचे लोक तिला वाचवण्यासाठी धावतात हे स्पष्टपणे दिसत आहे. लोकांनी प्रसंगावधान दाखवत काही सेकंदात महिलेला मॅनहोलमधून बाहेर काढले. मॅनहोलमधून बाहेर काढल्यानंतर महिला बराच वेळ शॉकमध्येच राहिली.