तुमच्या मोबाईलवर एक अज्ञात व्हिडिओ कॉल आला आणि तुम्ही तो उचलला तर तुम्हीही फसवणूकीच्या जाळ्यात अडकू शकता. अशाप्रकारे व्हिडिओ कॉल करून फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंग (blackmailing) करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान, असेच ब्लॅकमेलिंग रॅकेट संपूर्ण राजस्थानात पसरलेले आहे. (video call girl nude photos videos blackmailing honey trap gang arrest shriganganagar police rajasthan)
व्हिडिओ कॉलवर कपड्यांशिवाय मुलगी पाहून तुमचे फोटो काढले जातात आणि ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होतो. अशाच एका प्रकरणात राजस्थानच्या श्रीगंगानगरच्या (shriganganagar) रामसिंगपूरमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आतापर्यंत सापळा रचून शेकडो लोकांना हनीट्रॅपचा (honey trap) बळी बनवणाऱ्या टोळीपर्यंत रामसिंगपूर पोलीस पोहोचले आहेत.
पोलीस स्टेशन अधिकारी सुरजीत कुमार यांनी सांगितले की, ही टोळी श्रीगंगानगर जिल्ह्यातील पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी बनली होती. या ठिकाणी हनीट्रॅप टोळी कार्यकर होती. श्री करणपूर, रायसिंगनगर, श्री विजयनगर येथे शेकडो लोकांची या टोळीकडून फसवणूक करण्यात आली आहे. मात्र, फसवणूक झालेले लोक हे स्थानिक लोकांच्या भीतीमुळे किंवा लाज या कारणामुळे पोलिसांपर्यंत पोहोचत नव्हते.
लाखो रुपयांची वसुलीसरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिकांची सापळा रचून फसवणूक करण्यात आली होती. महिलांसोबत अश्लील व्हिडिओ बनवून लाखो रुपये वसूल करण्यात आले. बिकानेरच्या जमीन विकास बँकेचे व्यवस्थापक इफ्तकर अहमद यांचे अपहरण केल्यानंतर पोलीस हनीट्रॅप टोळीपर्यंत पोहोचले. इफ्तकर अहमदच्या फोनवरून हनीट्रॅप टोळीचे लोक खंडणीची मागणी करत होते. या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना रिमांडवर घेण्यात आले आहे.