Video : तिवसा येथे जंगलाला आग;आग विझविण्यासाठी गेलेली अग्निशमन दलाची गाडी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:22 IST
Fire in Forest : तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती.
Video : तिवसा येथे जंगलाला आग;आग विझविण्यासाठी गेलेली अग्निशमन दलाची गाडी जळून खाक
ठळक मुद्देही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.
सुरज दाहाटतिवसा - अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी,सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे आजही ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतची नवीन अग्निशमन दलाची गाडीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात नगरपंचायतचे तीन कर्मचारी या आगीत किरकोळरित्या जखमी सुद्धा झालेत, तर ही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.
तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती. ती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. तर ही आग अनियंत्रित झाल्याने आग विझविण्यासाठी ही गाडी आली होती. मात्र ही आग विझविण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतची गाडीच जळून खाक झाली,यावेळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे सह उपस्थित होते.
तिवसा नगर पंचायत चे अग्निशमन वाहन जळून खाक , वनविभागाच्या जागेतील आग गावात शिरू नये यासाठी आग आटोक्यात आणताना गाडी ला च आग लागली आणि हा दुर्दैवी अपघात झाला आहे. सुदैवाने जीवितहानी नाही पण तिवसा तालुक्यातील व शहरातील आगीच्या १२ घटना या वाहनाने निस्तरल्या होत्या. अजूनही कायमस्वरूपी पदभरती, पत्रव्यवहार करून सुद्धा जिल्हा प्रशासन व नगर विकास शाखेने या वाहनांवर कंत्राटी पद्धतीचे सुद्धाने भरले गेले नाही. एक वर्षांपूर्वीच सदर अग्निशमन वाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर , जिल्हानियोजन समिती व नगर पंचायत मार्फत प्राप्त झाले होते. तालुक्याच्या ठीकाणी अंत्यत आवश्यक असलेले हे वाहन आज जळून खाक झाले. ज्या अधिग्रहित विहीरिवरून तिवसा शहराला पाणीपुरवठा होतो त्या विहिरीवरून अग्निशमन , पाणी टँकर, व पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुद्धा जिल्हा नियोजन समितीने २४ तास वीज पुरवठा चे काम मंजूर झाले आहे पण काही शेतकऱ्यांनी हे काम महिन्याभरापासून थांबवून ठेवले आहे त्यामुळे तिवसा शहराला पाणी टंचाई , अग्निशमनला पाणीपुरवठा या बाबींना अडचण निर्माण होत आहे हे विशेष.