मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पोलिसांना कॉंक्रिट मिक्सर ट्रकच्या टाकीमध्ये अठरा जण प्रवास करताना आढळले. एएनआयने स्थानिक अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, केंद्राने अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी दिली आहे.
एएनआयने 41 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्वीट केला असूूून त्यात लोक एकामागून एक टाकीमधून बाहेर पडताना दिसत आहे. ते 18 जण महाराष्ट्रातून लखनौला जात होते. ट्रक पोलिस ठाण्यात पाठविण्यात आला आहे आणि एफआयआर नोंदविण्यात आला आहे. इंदूर-उज्जैन रोडवर आज सकाळी पंथपिपलाई बॉर्डरवर पोलिसांनी एक सिमेंट काँक्रिटचा मिक्सर थांबवला. पोलिसांनी थांबवल्यामुळे चालक घाबरला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी सिमेंट मिक्सर चेक केला असता त्यामध्ये 18 मजूर लपून बसलेले होते. त्यानंतर सर्वांना पोलिसांनी बाहेर काढून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक उमाकांत चौधरी यांनी एएनआयने दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने 29 एप्रिल रोजी अडकलेल्या प्रवासी कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी परत यावे यासाठी आंतरराज्यीय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तरीदेखील स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या हालचाली नॉन कंटेन्मेंट झोनपुरत्या मर्यादित केल्या जातील.
Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरच्या ३ पोलिसांना कोरोना
CoronaVirus: रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना
गृृृह मंत्रालयाने म्हटले आहे की नवीन मार्गदर्शक तत्त्वे 4 मेपासून अंमलात येतील, ज्यामुळे "अनेक जिल्ह्यांना विश्रांती मिळेल." मार्गदर्शक सूचनांनुसार अनेक अडकलेली लोक कठोर वैद्यकीय तपासणी करून घरी परत जाऊ शकतात.
राज्याने अडकलेल्या सर्वांसाठी थर्मल टेस्टिंग युनिट्स आणि अलग ठेवण्याच्या सुविधा देखील त्यांना पाठविण्यापूर्वी नियोजन केले पाहिजेत. त्यांनी वाहतुकीसाठी सॅनिटाइज्ड बसेसचीही व्यवस्था केली पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.
कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून मार्चपासून देशभरातून पायी व सायकल, नौका आणि रुग्णवाहिकांवर प्रवास केल्याच्या वृत्ताची नोंद झाली आहे. त्यास दोनदा आणि आता 17 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बरेच लोक दूरवर प्रवास करताना मरण पावले आहेत.