Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:17 PM2020-05-12T13:17:04+5:302020-05-12T13:20:05+5:30
आपल्या जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला आहे. देशात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र अशा बिकट परिस्थितीत एक पोलीस अधिकारी चक्क स्टंटबाजी करत सिंघमगिरी करताना दिसत आहेत.
दमोह - कोरोनाच्या लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांसह संबंध देशात पोलिसांनी देखील सैनिकाप्रमाणे भूमिका बजावली आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी समाजातल्या गरजू लोकांसाठी मदतीचा हात देऊन माणुसकी दाखवली आहे. तसेच देशात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी रस्त्यावर उतरले. आपल्या जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला आहे. देशात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र अशा बिकट परिस्थितीत एक पोलीस अधिकारी चक्क स्टंटबाजी करत सिंघमगिरी करताना दिसत आहेत. याप्रकरणी स्टंटबाजी करणाऱ्या पोलिसाला कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे.
PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी
लॉकडाऊनच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पूनम पांडेने व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया
Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल
धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे
मध्य प्रदेशातील दमोह येथील पोलीस उपनिरिक्षक मनोज यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता अजय देवगणप्रमाणे सिंघम स्टाइल स्टंट करताना मनोज यादव दिसत आहे. दोन गाड्यांवर पाय ठेवून उभे राहून खाकी वर्दीत मनोज यादव सिंघम गाणं गात आहेत. हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे की, त्यांनी स्वत: तयार केला आहे. हे अद्याप कळू शकलेले नाही आहे. तसेच काहींच्या मते हा व्हिडीओ जुना असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Actor नही, Sub Inspector है ... !!! #MadhyaPradesh के दमोह जिले के एक सब इंस्पेक्टर 👇🏼 का वीडियो !
— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) May 11, 2020
एसपी ने दिए जांच के आदेश... pic.twitter.com/P2mMQy3Bnx
ड्युटी सोडून असे व्हिडीओ तयार करणाऱ्या कोरोना वॉरियर्सवर कारवाई करण्याची मागणीही काहींनी केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधीही मनोज यादव यांनी पोलीस वर्दीत असे व्हिडीओ केले होते. आता या व्हिडीओसंदर्भात दमोह जिल्ह्यात खूप चर्चा रंगली असून पोलीस विभागात याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.