कानपूर - शहरातील एका घरात महिला गळफास घेत लटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात पतीच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडत होता. परंतु त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न न करता हा व्हिडिओ शूट करत राहिला. या घटनेनंतर पतीने सगळ्यांना जे सांगितले ते हैराण करणारं होते. २५ ऑक्टोबरला हा व्हिडिओ समोर आला. जो कानपूरच्या गुलमोहर पार्कमधील होता.
दुपारी १२.३० च्या सुमारास घरातील खोलीत असलेल्या बेडवर खुर्ची ठेवली होती. बेडवरील अंथरुणामुळे खुर्चीचा बॅलेन्स होत नव्हता. त्या छतावरील पंख्यावर दुप्पटा होता आणि त्याच दुप्पट्याच्या सहाय्याने एक महिला जीव वाचवण्यासाठी तडफडत असल्याचं दिसून आले. कधी ही महिला समोर बोलत होती. कधी उभी राहायची त्यामुळे खोलीत आणखी एक व्यक्ती असल्याचं स्पष्ट होते. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत होता. त्याच आवाजही आहे. हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर २ तासांनी तो व्यक्ती शोभिताने आत्महत्या केली असं फोन करून सांगतो.
व्हिडिओत जी महिला दिसत होती तिचं नाव शोभिता, तर तिच्या मृत्यूच्या काही क्षण आधी खोलीत बसून या घटनेचं चित्रण करणारा व्यक्ती संजीव गुप्ता. संजीव आणि शोभिता दोघं पती-पत्नी होते. शोभिता ज्यावेळी गळफास घेत तडफडत होती तेव्हा संजीव तिचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होता. मग पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न पतीने केला का नाही? असा प्रश्नही निर्माण होतो. शोभिताचा व्हिडिओ शूट केल्यानंतर २ तासांनी संजीव त्याच्या सासरी फोन करतो आणि शोभिताच्या मृत्यूची बातमी देतो. शोभिताचे आई वडील कानपूरमध्येच राहतात. ही घटना कळताच ते शोभिताच्या घरी तातडीने आले.
शोभिताच्या घरच्यांनी पोलिसांना दिला जबाबघरी येऊन पाहताच शोभिताचा मृतदेह बेडवर पडला होता. संजीव तिच्या छातीवर दाब देत तिचा श्वास परत आणण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याचवेळी शोभिताला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले. पोलिसांनाही व्हिडिओ दाखवण्यात आला. जो संजीवने बनवून तिच्या आई वडिलांना पाठवला होता. त्यानंतर शोभिताच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलीस पती संजीवला अटक करतात.
लग्नानंतर सातत्याने होत होता वादसंजीव त्याच्या पत्नीला वाचवण्याऐवजी मरतानाचा व्हिडिओ का बनवत होता? तर शोभिता आणि संजीवचं लग्न ५ वर्षापूर्वी १८ फेब्रुवारी २०१७ रोजी झालं होते. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद व्हायचा. परंतु शोभिताने मंगळवारी अचानक हे टोकाचं पाऊल का उचललं हे स्पष्ट नाही. जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो शोभिताच्या मृत्यूपूर्वीचा आहे. आत्महत्या करतानाचा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ दुपारी १२.३० वाजता शूट करण्यात आला होता आणि संजीवने अडीचच्या सुमारास सासरी फोन केला. मग या २ तासांत काय घडले? असा प्रश्न उपस्थित होतो.
२ तासांत काय घडलं?शोभिता फासाला लटकल्याचं पाहून संजीवने कॅमेरा बंद केला. त्यानंतर खोलीत काय घडले? शोभिताने खरच आत्महत्या केली का? की हा व्हिडिओ शूट करून झाल्यानंतर तिची हत्या झाली या सर्व पैलूंवर पोलीस तपास करत आहेत. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, जर संजीवने वेळेवरच पत्नीला समजावलं असते तर कदाचित ती आज जिवंत असती. परंतु तो पत्नीच्या अखेरच्या क्षणी व्हिडिओ बनवण्यात गुंग होता. त्यामुळे या २ तासांत काय घडलं हे शोधणं पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.