मुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला आज सकाळी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र, याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर, आज हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर आता थोड्यावेळापूर्वी भायखळ्यातील कारागृहातून रियाची तब्बल एका महिन्यानंतर सुटका झाली असून कारागृहाबाहेर मीडियाची गर्दी झाली होती. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
रियाचा पाठलाग करू नका, अन्यथा...; मुंबई पोलिसांची सूचना
एक अभिनेत्री असलेल्या रियाला भायखळा कारागृहात पंख्याशिवाय आणि जमिनीवर चढईवर झोपावं लागलं होतं. मागील सुनावणीमध्ये विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळायला सांगितला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायलयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना जामीन मंजूर केला आहे. रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांना जामीन देण्यास न्यायलयाने नकार दिला आहे.
आता अँकर्स माफी मागणार का? रिया चक्रवर्तीला जामीन मिळताच असे रिअॅक्ट झालेत बॉलिवूडकरसुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. न्यायालयाने आज तिला जामीन मंजूर केला. यामुळे ती तब्बल एक महिन्यानंतर कारागृहातून बाहेर येणार आहे. यावेळी माध्यमांनी तिचा पाठलाग करू नये, अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली होती. अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले होते, “कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत घेणे अथवा चित्रिकरण करणे कायद्यानं गुन्हा आहे. यातून तुम्ही स्वत:चे तसंच रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घालत असता. याबाबत मुंबई पोलीस अतिशय कडक कारवाई करणार आहे. चालकच नव्हे तर त्याला जो सूचना देत असेल अथवा तसे करण्यास प्रवृत्त करत असेल, त्याच्यावरही कारवाई केली जाईल.”