ठळक मुद्देवृत्तसंस्था एएनआयने ट्विटरवर 40 सेकंदाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महिला सहायक उपनिरीक्षक (एएसआय) यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले.
नवी दिल्ली - राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीवरून पंजाबचेमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या घराबाहेर निषेध नोंदविणार्या भाजपा युवा कार्यकर्त्यांवर पाण्याच्या तीव्र फवाऱ्याचा मारा केला. चंदीगडमध्ये झालेल्या निषेधादरम्यान एक महिला पोलिसही जखमी झाली.वृत्तसंस्था एएनआयने ट्विटरवर 40 सेकंदाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महिला सहायक उपनिरीक्षक (एएसआय) यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. आजचा हा निषेध पंजाब आपचे प्रमुख भगवंत मान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोहालीतील अमरिंदर सिंग यांच्या घराबाहेर जमून एकत्र जमवून घोषणाबाजी सुरू केल्या.
पंजाबमध्ये तीव्र वीजटंचाई निर्माण झाल्याने पंजाब सरकारवर टीका होत आहे. शासनाने यापूर्वीच शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाचे कमी दिवस देण्याचे आदेश दिले आहेत आणि वातानुकूलन यंत्रणेसारख्या उच्च-उपभोग्य उपकरणाचा वापर कमी करण्याची विनंती विभागाला केली आहे. राज्यात विजेची मागणी दिवसाला १४००० मेगावॅटपेक्षा जास्त निर्माण झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुढच्या वर्षाच्या निवडणुकीत पक्षाला जिंकल्यास प्रत्येक घरात ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे.