विकास दुबे याचे कानपूर येथे शवविच्छेदनानंतर मृतदेहावर कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कारपार पडले. मेहुणा दिनेश तिवारी, पत्नी रिचा दुबे आणि मुलगाही अंत्यसंस्कारास पोहोचले होते. पत्नी रिचाने मीडियावर राग व्यक्त केला आणि असे सांगितले की ज्याने हत्या केली आहे, त्यालाही तसाच धडा शिकवेन. गरज भासल्यास मी बंदूकही उचलेन.विकासच्या वडिलांनी सांगितले की, जे घडले ते झाले ते ठीक झाले. अखेर विकासचा मेहुणा दिनेश तिवारी त्याचा मृतदेह घेण्यासाठी पोस्टमार्टमच्या घरी पोहोचला. येथून अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह भैरव घाट येथे नेण्यात आला. कानपूर पोलिस हत्येप्रकरणी मुख्य आरोपी हिस्ट्रीशीटर विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनहून यूपीला घेऊन जाणारी यूपी एसटीएफच्या पथकाच्या वाहनांचा ताफा दुपारी ३. ३० वाजता झाशी येथे पोहोचला. सचेंडी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर दोरदार पावसामुळे पोलिसांची गाडी बर्रा पोलीस स्टेशनजवळील महामार्गावर पलटी झाली. विकास शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.त्याने शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कानपूरच्या हैलट हॉस्पिटलमध्ये अरविंद अवस्थी, शशिकांत मिश्रा आणि विपुल चतुर्वेदी या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दोन तासांच्या व्हिडिओग्राफी समक्ष पोस्टमार्टम केले. विकासच्या छातीवरुन तीन गोळ्या जप्त केल्या आहेत, तर एक गोळी कंबरेत सापडली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...