शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
5
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
6
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
7
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
8
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
9
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
11
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
12
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
13
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
14
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
15
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
16
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
17
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
18
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
19
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 8:55 PM

आरोपीच्या वकीलांनी व्यक्त केली होती अपघातासह एन्काउंटरची भीती

ठळक मुद्देसध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा 1400 किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती.आठ पोलिसांच्या हत्याकांडामध्ये या दोघांचाही समावेश असून तेही यामध्ये वॉन्टेड असल्याचा दावा आरोपीच्या वकीलांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

ठाणे - उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांचा ट्रान्झिट रिमांड ठाणे न्यायालयाने सोमवारी मंजूर केला. त्यानंतर या दोघांचा ताबा उत्तरप्रदेश पोलिसांच्या पथकाकडे देण्यात आला. या दोघांनाही मंगळवारी मुंबईहून कानपूर येथे विमानाने घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली. सध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा 1400 किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर त्याचे काही साथीदार फरार झाले होते. ठाण्याच्या कोलशेत भागातून मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्यापैकीच अरविंद आणि सुशिल या दोघांना अटक केली. या दोघांनाही 12 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायाधीश रश्मी झा यांनी त्यांना 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांची रवानगी तळोजा (नवी मुंबई) कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, या दोघा आरोपींचा ताबा मिळविण्यासाठी कानपूर (उत्तरप्रदेश) पोलिसांच्या एका निरीक्षकासह तिघांचे पथक सोमवारी ठाण्यात पोहचले. या पथकाने या दोघांच्याही ट्रान्ङिाट रिमांडची मागणी केली. यावेळी आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी दोघांचा ताबा यूपी पोलिसांना देण्यात येऊ नये, तसेच अरविंद हा फक्त संशयित असल्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता करावी, अशी मागणी केली. या दोन्ही मागण्या फेटाळून लावत ठाणे सत्र न्यायालयाने कानपूर पोलिसांचा ट्रान्ङिाट रिमांड मंजूर केला. दोघा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावे, तसेच त्यांचा चौकशी अहवाल ठाणो न्यायालयात सादर करावा, असे निर्देशदेखील यावेळी न्यायालयाने उत्तरप्रदेश पोलिसांना दिले.दरम्यान, पावसाचे दिवस असल्यामुळे ठाणो ते कानपूर हे तब्बल 1400 किलोमीटरचे अंतर कापताना विकास दुबेप्रमाणोच गाडी उलटून अपघाताची तसेच एन्काऊंटरची भीती आरोपीच्या वकीलांनी व्यक्त केली. केवळ साथीदार असल्यामुळे एन्काऊंटरच्या भीतीने त्यांनी ठाण्यात आसरा घेतला होता. पण त्यांच्याविरुद्ध पोलिसांच्या खुनाचा कोणताही पुरावा नाही. त्याचबरोबर कोविडचे वातावरण आहे. त्यांचा कोरोनाचा अहवालही यायचा आहे. त्यामुळे वाहनाऐवजी विमानाने आरोपींना कानपूरला नेण्यात यावे, ही आरोपींची मागणी न्यायालयाने मान्य केली. त्याचबरोबर आठ पोलिसांच्या हत्याकांडामध्ये या दोघांचाही समावेश असून तेही यामध्ये वॉन्टेड असल्याचा दावा आरोपीच्या वकीलांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब उत्तरप्रदेशातील स्थानिक न्यायालयाच्या अखत्यारित असल्याचे ठाणो न्यायालयाने स्पष्ट करीत आरोपींचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेPoliceपोलिसArrestअटकthaneठाणेairplaneविमान