Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नीने धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे आता सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी खळबळ उडाली आहे.
अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत महिलेने तिचा उद्योगपती पती विकास मालूच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा पैसे बुडले तेव्हा त्याने सतीश कौशिकला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पाठवलेल्या तक्रारीत, विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीने आरोप केले आहेत.
अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू
तक्रारीत लिहिले की, “माझा १३ मार्च २०१९ रोजी विकास मालूशी कायदेशीर विवाह झाला होता. विकासनेच माझी ओळख अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशी करून दिली.
"२३ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक दुबईतील आमच्या घरी आले होते. यादरम्यान, त्यांनी विकासकडे त्यांचे १५ कोटी रुपये परत मागितले. त्यावेळी मीही तिथे उपस्थित होते. यावरून वाद झाला. सतीश कौशिक सांगत होते की त्यांना पैशाची नितांत गरज आहे. सतीश यांनी विकासला तीन वर्षांपूर्वी कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी १५ कोटी रुपये दिले होते. पण विकासने कोणतेही पैसे परत दिले नाहीत.", असंही तक्रारीत म्हटले आहे.
"माझे पती विकास मालू यांनी त्यावेळी सतीश कौशिक यांना पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते. त्याच रात्री मी पती विकास यांना या पैशा संदर्भात विचारले होते, यावेळी विकास म्हणाले, "त्यांनी १५ कोटी रुपये दिले आहेत, जे कोरोनाच्या काळात बुडाले. मग मी त्यांना विचारले की आता तुम्ही काय करणार, तेव्हा विकास म्हणाला, एखाद्या दिवशी रशियन मुलीला बोलावून सतीश कौशीकला निळ्या गोळ्यांचा ओव्हरडोज देईन. याच पद्धतीने त्याला मारेन, असंही तक्रारीत म्हटले आहे.
महिलेने पुढे सांगितले की, "दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक यांनी पुन्हा त्यांच्याकडे १५ कोटी रुपये मागितले, तेव्हा विकास मालू संतापला. यावेळी विकासने सतीशला सांगितले की, तुम्हाला एकदा सांगितले होते की नुकसान झाले आहे, भारतात जा मी पैसे परत करीन, जास्त आवाज करू नका. तुम्ही १५ कोटी रोख दिले आहेत. तुम्ही कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, असंही विकास मालू यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. (Satish Kaushik Death )