शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Vinayak Mete Accident Update: विनायक मेटेंच्या चालकाला अखेर अटक; अपघाताला कारणीभूत असल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:04 IST

अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते.

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. यामध्ये मेटे यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला जबाबदार असलेल्या मेटेंच्या कार चालकाला आज अटक करण्यात आली. सीआयडीने बुधवारी रसायनी पोलीस ठाण्यात कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. 

अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला होता. चालकाने मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. चालक एकनाथ कदम याने रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत, असे म्हटले होते.  हाच चालक दोषी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. विनायक मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज त्याला अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. ३०४ a, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

कदम हा मेटेंची कार १४०-१५० किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. परंतू तिथे आणखी एक गाडी ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यावरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी