अवघा देश दिवाळीच्या दिवशी फटाके फोडत होता, दिवे लावत होता, त्यावेळी गुजरातच्या बडोद्यामध्ये स्ट्रीट लाईट बंद करून पेट्रोल बॉम्ब फेकले जात होते, मारहाण केली जात होती. बडोद्यामध्ये काल रात्री मोठा हिंसाचार झाला. रात्री साडेबारा ते एक या अर्ध्या तासात समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली परंतू तोवर दिवाळीचा बेरंग झाला होता. लोक पोलिसांसमोरच पेट्रोल बॉम्ब फेकत होते.
बडोदा पोलिसांचे डीसीपी अभय सोनी यांनी सांगितले की अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत. स्ट्रीट लाईट बंद करून हा हिंसाचार करण्यात आला आहे. पानीगेटमधील मुस्लिम मेडिकल सेंटर जवळ ही दगडफेकीची घटना घडली आहे. चौकशी सुरु आहे.
यापूर्वी बडोदा येथे स्कूटरच्या धडकेनंतरही दोन गटांमध्ये हिंसाचार झाला आहे. यानंतर गदारोळात जोरदार दगडफेक आणि तोडफोड झाली. गुजरातच्या सूरत, खेडा, आणंदमध्येही वारंवार दंगलीच्या घटना घडल्या आहेत.
दिवाळीचे फटाके उडवताना १० जखमी, ४ गंभीरदिवाळी हा आनंदाचा आणि दिव्यांनी प्रकाशमान होण्याचा सण. घरोघरो मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली जाते. एकंदरीत सगळीकडे उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. मात्र, दिवाळीतील फटाके उडवताना काही अपघात होऊन या सणाला गालबोट लागते. हैदराबादमध्येही फटाके उडवताना अपघात होऊन १० जण जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.