बंगळुरू - बंगळुरूमधील एका शाळेसमोर मुलींच्या गटांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व तरुणी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्यामध्ये हाणामारी होत असल्याचेही दिसत आहे. ही घटना कुठे झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तसेच या हाणामारीमागे नेमकं कुठलं कारण होतं, हेही कळू शकलेलं नाही.
बंगळुरूमधील एका प्रतिष्ठीत शाळेतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. त्यामध्ये या विद्यार्थिनी एकमेकींना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बिशप कॉन्व्हेंट स्कूलमधील आहे आणि हे एक ऑल गर्ल स्कूल आहे. या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थिनी अन्य विद्यार्थिनींचे केस ओढताना दिसत आहेत. एवढंच नाही तर मुलींचे पालकही या झगड्यात सहभागी झालेले दिसत होते.
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार शाळेने या व्हिडीओंबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच भांडणाचं कारणही अद्याप अज्ञात आहे. मात्र या हाणामारीनंतर विद्यार्थिनींना जखमा झाल्या आहेत.
दरम्यान, शाळेच्या अधिकाऱ्यांनी या भांडणामध्ये ना हस्तक्षेप केला. ना त्यावर कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र या वादात सहभागी होणाऱ्या एका विद्यार्थिनीचा एक स्क्रीनशॉट खूप व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, रचना नावाच्या एका विद्यार्थिनीने तिला बिशप कॉटन गर्ल्स स्कूलमध्ये येऊन एका मुलीला मारण्यास सांगितले होते. कारण रचना आणि तिच्यात वाद होता.