शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

निशाण्यावर VIP: कार बॉम्बने दहशतवादी हल्ल्याची भीती, IB ने दिल्ली पोलिसांना दिले इनपुट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 2:02 PM

Terror Attack Possibility : आता इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचे इनपुट दिले आहेत. राजकारण्यांसह काही व्हीआयपींना टार्गेट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गाझीपूर मंडीमध्ये सापडलेल्या आयईडीमुळे दिल्ली पोलीस आणि सुरक्षा एजन्सी आधीच हैराण झाल्या आहेत, आता इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचे इनपुट दिले आहेत. राजकारण्यांसह काही व्हीआयपींना टार्गेट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.प्रतिबंधित खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिस प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती आयबीकडून मिळाली आहे. कारमध्ये स्फोटके ठेवून ही संघटना इंडिया गेट आणि लाल किल्ल्याभोवती हल्ला करू शकते. शिख फॉर जस्टिस गेल्या वर्षीप्रमाणे लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवण्याच्या घटनेची पुनरावृत्ती करू शकते, असेही इनपुटमध्ये आहे.दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून भारतात स्फोटके आणल्याचा दावा आयबीने केला आहे. गाझीपूर मंडीत सापडलेला आयईडी त्याचाच एक भाग होता. ज्या पद्धतीने जम्मू विमानतळावर ड्रोनने हल्ला करण्यात आला, त्याच धर्तीवर दहशतवादीही ड्रोनने हल्ला करू शकतात. ड्रोनने परेडच्या मार्गावर किंवा त्यामागे हल्ला केल्याचे बोलले जात आहे.वॉन्टेड यांनी आयएसआयशी केली हातमिळवणी

सीएए विरोधी चळवळीदरम्यान दिल्ली दंगलीतील काही फरार असलेल्या वाँटेड यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी हातमिळवणी केल्याचे संकेत मिळाले आहेत. सीएए आणि एनआरसी लागू होऊ नयेत अशी त्यांची इच्छा आहे. त्याचे काही विरोधक आणि सहानुभूती असलेले दोघेही आयएसआयच्या संपर्कात आहेत. 

हॅलो, सायकल मार्केटमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे...हॅलो, चांदणी चौकातील सायकल मार्केटमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून काही लोकांना जखमी केले आहे, तर काहींना ओलीस ठेवले आहे.

मंगळवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षात हा संदेश पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. काही वेळातच सायकल मार्केटचे पोलिस छावणीत रुपांतर झाले. कॅट्स अॅम्ब्युलन्स, अग्निशमन विभाग, डीडीएमए, स्पेशल सेल, स्वात, स्थानिक पोलिस आणि नागरी संरक्षण स्वयंसेवक तेथे पोहोचले.

अचानक झालेल्या हालचालीमुळे स्थानिक लोकही घाबरले. प्रत्यक्षात दहशतवादी हल्ला झाला असावा, असे त्यांना वाटले, पण काही वेळाने लोकांना कळले की, हा दहशतवादी हल्ला नसून मॉक ड्रिल आहे, तेव्हा त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.एका दहशतवाद्याला स्थानिक पोलीस आणि विशेष कर्मचार्‍यांनी पकडल्याचे मॉक ड्रीलमध्ये दाखवण्यात आले, तर उर्वरितांना स्पेशल सेलच्या पथकाने पकडले. जखमींना घटनास्थळावरून रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मंगळवारी गुप्तचर यंत्रणांनी राजधानीत दहशतवादी हल्ल्याचा इशाराही दिला होता.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादdelhiदिल्लीPoliceपोलिसRepublic Dayप्रजासत्ताक दिन