नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडण सोडवणं पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. आरोपीने पोलिसांना मारहाण केल्याची, त्यांचा मोबाईल तोडल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील बाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एसबीआय आणि पीएनबी बँकेच्यामध्ये असलेल्या ई-मित्र केंद्रामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ई-मित्र संचालकाचं एका व्यक्तीशी काही कारणास्तव भांडण झालं. याच दरम्यान त्या रस्त्यावरून पोलीस जात होते. मदतीसाठी त्याने लगेचच पोलिसांना हाक मारली. पोलीस देखील आले. त्यांनी भांडण मिटवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आरोपीने त्यांचं काही ऐकलं नाही. उलट त्यांच्यावरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांने जेव्हा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यासाठी आपला फोन बाहेर काढला. तेव्हा आरोपीन त्यांच्या हातातून फोन खेचून घेतला आणि तोडून टाकला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलीस आणि आरोपीमध्ये झटापट झाली पण त्याने पोलिसांवरच हल्ला केला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं. एसएचओ गजानंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेजवळ असलेल्या एका ई- मित्र केंद्रावर भांडण होत होतं. जेव्हा पोलिसांनी भांडण शांत करण्याच प्रयत्न केल तेव्हा आरोपीने मारहाण केली. याप्रकरणाचा अधिक तापस करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.